लुटेरी दुल्हनचा हैदोस! भावोजीची तब्येत बिघडल्याचं सांगत पळून गेली नवरी, २ लाखही केले लंपास....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:35 PM2021-02-11T13:35:06+5:302021-02-11T13:41:12+5:30

Crime News : एक फसवणुकीची (Fraud) घटना मध्य प्रदेशच्या(Madhya Pradesh) दमोहमधून समोर आली आहे. इथे एका नवरीने कारण दिलं की, तिच्या भावोजींची तब्येत बिघडली आणि सासर सोडून (Bride Ran Away) फरार झाली.

Damoh bride ran away after two months of marriage in Madhya Pradesh police looteri dulhan | लुटेरी दुल्हनचा हैदोस! भावोजीची तब्येत बिघडल्याचं सांगत पळून गेली नवरी, २ लाखही केले लंपास....

लुटेरी दुल्हनचा हैदोस! भावोजीची तब्येत बिघडल्याचं सांगत पळून गेली नवरी, २ लाखही केले लंपास....

googlenewsNext

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) 'लुटेरी दुल्हन'चा(Looteri Dulhan) हैदोस सध्या चांगलाच वाढत आहे. लोक आपल्या मुलांचं लग्न करतेवेळी भरपूर सावधानी बाळगतात. पण तरी सुद्धा लुटेरी दुल्हन त्यांना आपली शिकार बनवण्यात यशस्वी ठरत आहे. अशीच एक फसवणुकीची (Fraud) घटना मध्य प्रदेशच्या दमोहमधून समोर आली आहे. इथे एका नवरीने कारण दिलं की, तिच्या भावोजींची तब्येत बिघडली आणि सासर सोडून (Bride Ran Away)  फरार झाली.

दमोहच्या रनेह पोलीस स्टेशन परिसरात राहणारं एक कुटूंब लुटेरी दुल्हनचे शिकार(Marriage Fraud)  झालं आहे. २५ नोव्हेंबर २०२० ला रनेहचा राहणारा पुष्पेंद्रचं लग्न जबलपूरच्या प्रीती शर्मासोबत झालं होतं. दोघांचं लग्न कटनीतील एका मंदिरात झालं होतं. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार हे लग्न राज दुबे, कृष्णा दुबे आणि सीमा दुबे यांनी जुळवलं होतं. लग्नाच्या बदल्यात तिघांनी पुष्पेंद्र कडून २ लाख रूपये घेतले होते. (हे पण वाचा : अचानक घरी आल्यावर पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत पाहून पती भडकला आणि.....)

लुटेरी दुल्हन फरार

लग्नाच्या साधारण दोन महिन्यांनंतर नवरी प्रीतीने सांगितले की, तिच्या भावोजींची अचानक तब्येत बिघडली आहे. तिला माहेरून फोन आला आहे. यानंतर पुष्पेंद्र आपली पत्नी प्रीतीसोबत जबलपूर पोहोचला आणि सीमा दुबेच्या सांगण्यावरून पत्नीला तिथेच ठेवलं. पत्नीला सोडून पुष्पेंद्र घरी परतला. (हे पण वाचा : प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तरुणी अटकेत)

त्यानंतर काही दिवस पत्नी तिथेच माहेरी राहिली. बरेच दिवस झाले तरी पत्नी आली नाही म्हणून त्याने पत्नीला फोन केला. पण फोन काही लागला नाही. जेव्हा तो पत्नीला भेटण्यासाठी जबलपूरला पोहोचला तेव्हा ती तिथे नव्हती.

पत्नीला आणायला गेला आणि....

पीडित पुष्पेंद्रने सांगितले की, त्याने अनेकदा पत्नीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क काही झाला नाही. त्याला सीमा दुबे आणि राज दुबेने धमकी दिली की, येथून जा, नाही तर चांगलं होणार  नाही. पुष्पेंद्र त्यांना घाबरून घरी परतला आणि त्याने पोलिसात याबाबत तक्रार दिली.
 

Web Title: Damoh bride ran away after two months of marriage in Madhya Pradesh police looteri dulhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.