- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : राज्यात डान्सबारला बंदी असतानाही नवी मुंबईत मात्र बेकायदा डान्सबार चालत आहेत. त्यापैकी काही ठिकाणी महिला वेटरचे ग्राहकांसोबत अश्लील चाळे चालत असून त्यांच्यावर पैशाचीही उधळण होताना दिसून येत आहेत. मात्र, या डान्सबारवर कारवाई होत नसल्याने संबंधित सर्वच प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.शहरात कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा चालू देणार नाही अशी विद्यमान पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भूमिका आहे. पण कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खैरणेतील अश्विनी (स्वागत) या बारमध्ये बेकायदा डान्सबार चालत असल्याचे उघड झाले आहे. अनधिकृतरीत्या त्याठिकाणी बांधकाम करून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा बार चालत आहे. सदर बारला सर्व्हिस बारची परवानगी असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी डान्सबार चालवला जात आहे.
नवी मुंबईत सर्व्हिसबारच्या नावाखाली डान्सबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 1:18 AM