लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताला हवा असलेला फरार कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमला पैसा पुरविणारा पाकिस्तानी नागरिक अल्ताफ खानानी याने केलेले अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार अमेरिकी सरकारच्या फायनान्शिअल क्राइम्स एन्फोर्समेन्ट नेटवर्क (फिनसिन) या संस्थेने उजेडात आणले आहेत. खानानी हा लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनाही पैसा पुरवीत असल्याचे उघड झाले आहे.
या संशयास्पद व्यवहारांसंदर्भात न्यूयॉर्कमधील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने फिनसिनला एक अहवालही सादर केला आहे. अल्ताफ खानानीची मनी लाँड्रिंग करणारी संस्था व अल्् झरूनी यांच्यामध्ये हे व्यवहार सुरू आहेत. खानानीची संस्था दरवर्षी अल्् कायदा, हिज्बुल्ला, तालिबान या दहशतवादी संघटना व अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना १४ ते १६ अब्ज डॉलर देत असावी, असा फिनसिनचा कयास आहे. खानानी याला ११ सप्टेंबर २०१५ रोजी पनामा विमानतळावर अटक करण्यात येऊन मियामीमधील तुरुंगात त्याला डांबण्यात आले. त्याचा कारावास जुलै महिन्यात संपल्याने त्याला अमेरिकेतून दुसरीकडे हलविण्यात आले. खानानीला पाकिस्तानला की यूएईला पाठविले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
अल्ताफ खानानी याच्या दाऊद इब्राहिमशी असलेल्या संबंधांबाबत अमेरिकी सरकारनेही आपल्या गोपनीय कागदपत्रांमध्ये उल्लेख केले आहेत. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट मालिका घडविल्यानंतर फरार झालेला व सध्या पाकमध्ये असल्याचा संशय असलेल्या दाऊद इब्राहिमला मोठ्या प्रमाणावर खानानी याने पैसा पुरविल्याचे फिनसिन संस्थेने म्हटले आहे.दहशतवाद्यांशी घनिष्ठ संबंधच्खानानी दाऊद व काही दहशतवादी संघटनांना कायम मदत केली आहे हे ११ डिसेंबर २०१५ रोजी फिनसिनने जारी केलेल्या अधिसूचनेतही म्हटले होते.च् खानानी याच्या अमेरिकेने केलेल्या चौकशीतून त्याचे दहशतवाद्यांशी असलेले जवळकीचे संबंध उजेडात आले होते.