शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

दाऊदला झटका! हसीना पारकरच्या नागपाड्यातील घराचा झाला १ कोटी ८० लाखाला लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 1:14 PM

हसीना पारकरच्या नागपाडा येथील येथील घराचा लिलाव आज करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील घरावर टाच आणून आज लिलावात गार्डन हॉलमधील फ्लॅट १ कोटी ८० लाखांना विकण्यात आला आहे. गेल्या वर्षी सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सर्वाधिक म्हणजे 11.58 कोटी रुपयांची लावून या मालमत्तांचा ताबा मिळवला आहे. 

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकरच्या नागपाडा येथील येथील घराचा लिलाव आज करण्यात आला आहे. केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील घरावर टाच आणून आज लिलावात गार्डन हॉलमधील फ्लॅट १ कोटी ८० लाखांना विकण्यात आला आहे. 

२०१४ रोजी हसीनाच्या मृत्यूआधी हसीना याच फ्लॅटमध्ये राहत होती तसेच देश सोडून फरार होण्याआधी कुख्यात गुंड दाऊद हा देखील याच फ्लॅटमध्ये राहत होता. 2014 रोजी हसीना पारकरच्या मृत्यूनंतर धाकटा भाऊ इक्‍बाल कासकर तेथे रहायचा. 2017 मध्ये खंडणीप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने दाऊदचा भाऊ इक्‍बाल कासकरला तेथूनच बेड्या ठोकल्या होत्या. सीबीआयने १९९७ साली दाऊदच्या या घरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. सफेमा यांनी दाऊदच्या गार्डन हॉल अपार्टमेंटमधील फ्लॅटवर टाच आणल्यानंतर त्याच्या लिलावासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तसेच लिलावासाठी १ कोटी ६९ लाख किंमत ठरविण्यात आली होती. 

सफेमा कायद्याअन्वये तस्करी व बेकायदेशीर कृत्यातून जमा केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतो. या कायद्याच्या कलम 68 फ अंतर्गत तस्कर करणाऱ्या आरोपीच्या नातेवाईंच्या मालमत्ताही जप्त करण्याची तरतुद आहे. ही यंत्रणा थेट केंद्रीय वित्त मंत्रालयाच्याअंतर्गत कामकाज अथवा कारवाई करते. त्यांना 1998 मध्ये या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश देण्यात आले होते. हसीना पारकरच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाने या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. एप्रिल 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाऊदच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. दाऊदच्या कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका यावेळी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानुसार या घरावर टाच आणली असून पुढच्या कारवाईनुसार या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यात रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचा देखील सहभाग होता. गेल्या वर्षी सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सर्वाधिक म्हणजे 11.58 कोटी रुपयांची लावून या मालमत्तांचा ताबा मिळवला आहे. 

 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमCBIगुन्हा अन्वेषण विभाग