मुंबई - कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जुना आणि विश्वासू साथीदार गुंड तारिक परवीनला रविवारी अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. एजाज लकडावालाच्या चौकशीत उघड झालेल्या माहितीतून ही कारवाई करण्यात आली. तारिक परवीन हा अटक आरोपी एजाज लकड़ावालासाठी काम करत होता. खंडणीवसुलीसाठी त्याची महत्वाची भूमिका असायची. सध्या मुंबईतील दाऊदचा व्यवहाराचे व्यवस्थापन परवीन करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे त्याची अटक महत्त्वपूर्ण असून त्याच्या अटकेमुळे डी कंपनीतील हालचालींची माहिती पोलिसांनी मिळू शकते.ॉ
एका व्यापाऱ्याकडून खंडणी मगितल्याप्रकरणी परवीनला अटक करण्यात आली आहे. ३ लाखांची खंडणी घेऊन देखील तो व्यापाऱ्याला त्रास देत होता. मात्र, लकडावालच्या अटकेनंतर परवीनचे बिंग फुटले. याआधी तारिक परवीन हा तुरुंगात देखील होता. नंतर जामिनावर त्याची सुटका झाली होती. परवीन व्यतिरिक्त गॅंगस्टर एजाज लकडावालाचा हस्तक सलीम फर्निचरवाला उर्फ महाराजलाही याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी रविवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आरोपींनी क्रॉफर्ड मार्केट येथील सुका मेवा विक्रेत्याकडे खंडणी मागितली होती. परवीनने तक्रारदाराकडून ३ लाख रुपये घेतल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले. त्यानंतर डोंगरी परिसरातून परवीनला अटक करण्यात आली. २०१८ मध्ये परवीनला ठाणे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती.दाऊदचा हस्तक तारिक परवीनला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक
तारिक परवीनला जामीन
दाऊदचा हस्तक कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बिहार, पाटणा विमानतळावरून जानेवारीमध्ये अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. यापकरणी त्याची चौकशी सुरु असताना त्याच्या मुलीला देखील खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. तसेच खंडणीच्या या प्रकरणात लकडावालासह महाराज ही सहभागी असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार महाराजालाही याप्रकरणी अटक करण्यात आली.