लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्करदराच्या भांडेप्लॉट चौकात गुन्हेगाराने दिवसाढवळ्या डॉक्टरवर तलवारीने हल्ला केला. सतर्क असल्यामुळे डॉक्टरने खाली वाकून आपला जीव वाचविला. यामुळे त्यांच्या हाताला जखम झाली. बुधवारी दुपारी घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.बेलतरोडी मार्गावरील रहिवासी डॉ. नितीन गुंडकवार दंतरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचे भांडेप्लॉट चौकात क्लिनिक आहे. ज्या अपार्टमेंटमध्ये क्लिनिक आहे त्याच्या पार्किंगमध्ये नूर शेख आणि त्याचा मुलगा शेरखान शेख ऊर्फ बंटी अवैध बिर्यानी सेंटर चालवीत होते. अपार्टमेंटच्या नागरिकांनी त्याची एनआयटीत तक्रार केली होती. जुलै २०१९ मध्ये एनआयटीने त्यांचे अतिक्रमण हटविले. त्यावेळी दोघांनी हंगामा केला होता. त्यावर दोघांनी डॉ. गुंडकवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. डॉ. गुंडकवार यांनी याबाबत सक्करदरा पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी नूर खान आणि त्याच्या मुलाला धमकी दिली होती. पोलिसांनी कडक कारवाई न केल्यामुळे दोघांनी गुंडकवार यांना धडा शिकविण्याचे ठरविले. नेहमीप्रमाणे डॉ. गुंडकवार दुपारी २.४५ वाजता क्लिनिक बंद करून घरी जाण्यासाठी निघाले. त्यांनी आपली कार अपार्टमेंटसमोर उभी केली होती. ते कारमध्ये बसत असताना त्यांना नूर खान तलवार घेऊन येताना दिसल्यामुळे ते सावध झाले. नूर खानने डॉ. गुंडकवार यांच्यावर हल्ला चढविला. त्याने त्यांच्या डोक्यावर वार केला. सावध असल्यामुळे डॉ. गुंडकवार खाली वाकले. त्यामुळे तलवार कारला लागल्यावर त्यांच्या डाव्या हाताला लागली. यात ते जखमी झाले. नूर खानच्या हल्ल्यामुळे डॉ. गुंडकवार जीव वाचवून क्लिनिकमध्ये पळाले. नूर खान त्यांचा पाठलाग करीत येत होता. डॉ. गुंडकवार क्लिनिकमध्ये लपल्यामुळे तो हंगामा करून फरार झाला. घटनेच्या वेळी भांडेप्लॉट चौकात गर्दी होती. दिवसाढवळ्या हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली. घटनेची माहिती कळताच सक्करदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. नूर खान आणि त्याचा मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. ६ जुलैला सकाळी नूर खानचा मुलगा शेरखान ऊर्फ बंटीने परिसरात मेवाड जनरल स्टोअर्सच्या संचालकावर तलवारीने हल्ला केला होता. त्यात दुकानदार गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकात दहशत पसरली आहे. त्यावर बंटीने अपार्टमेंटचाजिना तोडला. त्याबाबतही पोलिसात तक्रार देण्यात आली. बंटी लागोपाठ गुंडागर्दी करूनही सक्करदरा पोलिसांनी गंभीरता दाखविली नाही. यामुळे बंटीने डॉ. गुंडकवार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.डॉक्टरांमध्ये रोष, कारवाईची मागणीया घटनेमुळे शहरातील डॉक्टरांमध्ये रोष पसरला आहे. त्यांच्या संघटनेने याबाबत गुरुवारी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेण्याचे ठरविले आहे. परिसरातील नागरिकांनी बंटी आणि त्याच्या वडिलांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या मते, अवैध बिर्यानी सेंटर हटविल्यामुळे दोघांनी परिसरात दहशत पसरविणे सुरू केले. परिसरातील गुन्हेगारही त्यांच्याशी निगडित आहेत. ते सक्रिय झाल्यास मोठी घटना घडू शकते.
नागपुरात डॉक्टरवर दिवसाढवळ्या तलवारीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:59 PM
सक्करदराच्या भांडेप्लॉट चौकात गुन्हेगाराने दिवसाढवळ्या डॉक्टरवर तलवारीने हल्ला केला. सतर्क असल्यामुळे डॉक्टरने खाली वाकून आपला जीव वाचविला. यामुळे त्यांच्या हाताला जखम झाली. बुधवारी दुपारी घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
ठळक मुद्देभांडेप्लॉट चौकातील घटना : आरोपी वडील-मुलामुळे नागरिक त्रस्त