शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

दिवसाढवळ्या फिल्मीस्टाईल दरोडा; सराफाचे हात तोंड बांधून बेदम मारहाण करून दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 8:36 PM

Dacoity Case : पिस्तुलाच्या धाकावर सराफा दुकानात दरोडा

ठळक मुद्देचार लाखांची रोकड आणि दागन्यांसह २० ते २५ लाखांचा ऐवज लंपासवर्दळीच्या भागात दिवसाढवळ्या गुन्हा; शहरात खळबळ, पोलिसांची धावपळ

नागपूर - पिस्तुलाच्या धाकावर सराफा व्यावसायिकाला बेदम मारहाण करून चार दरोडेखोरांनी सराफा दुकानातून सुमारे साडेचार लाखांची रोकड आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २० ते २५ लाखांचा ऐवज लुटून नेला. सोमवारी दिवसाढवळ्या जरीपटक्यातील अत्यंत वर्दळीच्या नारा मार्गावर ही दरोड्याची घटना घडली. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.जरीपटक्यातील भीम चाैकाजवळ नागसेननगर आहे. अत्यंत वर्दळीचा हा परिसर आहे. मुख्य रस्त्यावर एका छोट्याशा गाळ्यात अवनी ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास ज्वेलर्सचे संचालक आशिष रवींद्र नावरे (वय ३५, रा. ठवरे कॉलनी) हे एकटेच दुकानात बसून होते. अचानक दोघे दुकानात आले. त्यांनी नावरे यांना सोन्याची साखळी दाखवा म्हटले. नावरे यांनी सोनसाखळीचा ट्रे समोर ठेवताच तिसरा दरोडेखोर दुकानात शिरला. त्याने आतून शटर ओढून घेतले. चवथा एक बाहेरच थांबला. धोका लक्षात आल्याने नावरे यांनी ओरडण्याा प्रयत्न करताच एकाने त्यांचा गळा दाबला. दुसऱ्याने पिस्तुल कानशिलावर ठेवले. नंतर टेपपट्टी त्यांच्या तोंडावर लावली आणि त्यांचे हात बांधले. त्यांनी विरोध केला असता एका दरोडेखोराने त्यांच्या तोंडावर ठोसे मारून त्यांना जबर जखमी केले. त्यांच्या तोंडावर शेंदरी रंगाचा कापड टाकून त्यांना त्यांची बसण्याची खुर्ची आणि काउंटरच्या निमळत्या जागेत कोंबले. त्यांचा मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर दरोडेखोरांनी तिजोरीतील चार ते साडेचार लाखांची रोकड आणि शोकेसमधील ६०० ग्राम सोन्याचे आणि १० किलो चांदीचे दागिने असा सुमारे २० ते २५ लाखांचा ऐवज लुटून नेला. जाताना त्यांनी सीसीटीव्हीचा स्वीच काढून घेतला.
संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैदहा संपूर्ण घटनाक्रम दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरोडेखोर गेल्यानंतर नावरे यांनी स्वताचे हात कसेबसे सोडवून घेतले आणि शटर उघडून ते बाहेर आले. त्यानंतर त्यांनी आजुबाजुच्यांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनाही माहिती कळविली. त्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली. घटनास्थळी जरीपटक्याचा पोलीस ताफा पोहचला. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि उपायुक्त निलोत्पल हे देखिल आपल्या ताफ्यासह पोहचले. नावरे यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर तसेच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांची विविध पथके दरोडेखोरांच्या शोधासाठी कामी लावण्यात आले.

दिशाभूल करण्याचे तंत्रदरोडेखोरांनी या गुन्ह्यात पल्सर तसेच पांढऱ्या रंगाची अपाचे अशा दोन दुचाकींचा वापर केला आहे. चार पैकी तिघांनी तोंडावर मास्क लावले होते तर एकाने बुरखा घातला होता. विशेष म्हणजे, दरोडेखोर हिंदीत बोलत होते. एकमेकांचे अफजल आणि तसेच काहीसे नाव घेऊन आपसात संभाषण करत होते. मात्र, त्यांनी आपल्या मनगटावर धागे बांधले होते. त्यांनी दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला असावा, असा अंदाज आहे. दरम्यान, आरोपींचा कसून शोध सुरू असून आम्ही लवकरच त्यांच्या मुसक्या बांधू, असा विश्वास अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :DacoityदरोडाnagpurनागपूरjewelleryदागिनेRobberyचोरीPoliceपोलिसGoldसोनंSilverचांदी