अमरावती - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून गृह विभागाच्याावतीने कैद्यांच्या शिक्षेत माफी देत त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने येथील मध्यवर्ती कारागृहाने यंदा शासनाकडे सात सर्वसामान्य कैद्यांच्या माफीसाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे किती कैद्यांना माफी मिळते. हे २ ऑक्टोबररोजी स्पष्ट होणार आहे.२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०२० या दरम्यान महात्मा गांधी यांची १५० वी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. सत्य, अहिंसा ही महात्मा गांधी यांची शिकवणूक आहे. त्यानुसार शासनाने कारागृहात बंदिस्त असलेल्या सामान्य कैद्यांसाठी शिक्षेत माफी ही विशेष योजना राबवित आहे. गृह विभागाने कैद्यांच्या शिक्षेत माफी देण्याबाबत अटी, शर्थीदेखील लादल्या आहेत. टाडा, खून, दहशतवादी, पोस्को, देशविघातक कारवाया, बलात्कार, अंमली पदार्थ तस्करी गुन्ह्यातील कैद्यांना ही सवलत मिळणार नाही, असे शासनाने अगोदरच स्पष्ट केले आहे. केवळ सर्वसामान्य कैद्यांना शिक्षा माफीचा लाभ मिळणार आहे. यात महिला कैदी ५५ वर्षांवरील, तर पुरूष कैदी ६० वर्षांवरील असणे नियमावली आहे. शिक्षेदरम्यान या कैद्यांची वागणूक सौजन्याची असणे आवश्यक करण्यात आली आहे. तसेच, ७० टक्के अपंग असलेल्या कैद्यांना शिक्षा माफीचा लाभ मिळेल, अशी नियमावली आहे. सात कैद्यांपैकी किती जणांना माफी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
महात्मा गांधी जयंतीदिनी होणार सुटका; कारागृहातून शिक्षा माफीसाठी सात कैद्यांचे प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 6:54 PM
सर्व सामान्य बंदीजनांना मिळणार न्याय
ठळक मुद्दे२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०२० या दरम्यान महात्मा गांधी यांची १५० वी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. ७० टक्के अपंग असलेल्या कैद्यांना शिक्षा माफीचा लाभ मिळेल, अशी नियमावली आहे. सात कैद्यांपैकी किती जणांना माफी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.