एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी मोठी कारवाई करत मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन गेला होता. त्यानंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपास करत कोलकाताहून आरोपीस अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. पलाश बोस असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.उद्धव ठाकरे, शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका अज्ञात नंबरहून धमकीचे फोन आले होते. देशमुख यांनी कंगना राणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले असल्याचं मह्टलं होतं. या फोन प्रकरणाची चौकशी सुरक्ष यंत्रणा करत होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारा व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणा करत होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबईवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची फोन करणाऱ्याने धमकी दिली. दुबईहून अज्ञात व्यक्तीने 3 ते 4 फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याही माहिती पुढे आली होती.ज्यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांची क्राईम ब्रांचकडून चौकशी करण्यात आली माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी आरोपींचा शोध लावत त्यांना कोलकाताहून ताब्यात घेण्यात आलं आहे. या आरोपींची चौकशी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री 11च्या सुमारास 4 फोन कॉल दुबईच्या नंबरवरून आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलीस ऑपरेटरने घेतले होते. त्यानंतर मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था वाढिण्यात आली होती.
बोसचे दुबईत पाच वर्षे वास्तव्य
बोसकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्याने बीएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे. नोकरीनिमित्त तो 15 वर्षे दुबईत वास्तव्याला होता. या काळात त्याने तेथील मोबाईलचे दोन सिम कार्ड वापरले होते. त्याच्यासह तीन मोबाईल जप्त केले आहेत. कंगणा रानॊतचा फॅन असल्याचे सांगितले असलेतरी दुबईत दीर्घकाळ वास्तव्य केले आहे. त्यामुळे त्याची गुन्हेगारी टोळ्याशी संबंध आहेत का, त्याच्यावर अन्य गुन्हे दाखल आहेत का, याबाबत तपास करण्यात येत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल
बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले
दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला
सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम
धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या