मुंबई - उत्तर प्रदेशपोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेल्या कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या फरार साथीदाराला त्याच्या वाहनचालकासह ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. अरविंद उर्फ गुडडन रामविलास त्रिवेदी (वय 46) आणि सुशीलकुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी (30) अशी त्यांची नावे असून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस)जुहू विभागाने शनिवारी पहाटे ही कारवाई केली. अरविंद त्रिवेदी हा ठाण्यातील कोलशेत रोडवर एके ठिकाणी लपला असता पथकाने त्याला शिताफीने पकडले. याबाबत उत्तर प्रदेशपोलिसांना कळविण्यात आले असून रविवारी दोघांना त्याच्या ताब्यात दिले जाईल, असे सांगण्यात आले.
कानपुरमध्ये 3 जुलैला दुबे व त्याच्या साथीदाराकडून आठ पोलिसांच्या हत्याकाडात गडडन त्रिवेदीचाही समावेश होता.घटनेनंतर तो फरारी होता, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला पकडणाऱ्यासाठी मोठे बक्षीस जाहीर केले होते. गँगस्टर विकास दुबे याचा शुक्रवारी एन्काऊटर करण्यात आल्यानंतर काही तासातच त्याच्या निकटच्या साथीदाराला पकडण्यात एटीएसला यश आले आहे.
कानपुरमध्ये 8 पोलिसांना अत्यंत क्रूरतेने मारल्यानंतर सर्वजण फरार झाले असून त्याच्या शोधासाठी देशभरातील पोलीस यंत्रणाना कळविण्यात आले आहे. दुबेचा एक साथीदार मुंबई, ठाणे परिसरात लपण्यासाठी आला असल्याची माहिती एटीएसच्या जुहू विभागाच्या पथकाला खबऱ्याकडून मिळाली. त्याबाबत प्रभारी निरीक्षक दया नायक यांनी वरिष्ठाना कल्पना दिली.त्याच्या सूचनेनुसार सहाय्यक निरीक्षक दशरथ विटकर, सचिन पाटील, सागर कुंजिरे हे शनिवारी पहाटे अन्य अंमलदाराना घेऊन पुरेशा तयारीनिशी गेले. ठाण्यात कोलशेत रोडवर त्रिवेदी व त्याचा वाहनचालक त्रिपाठी मिळून आले. त्याला ताब्यात घेऊन हटकले असता कानपुर पोलीस हत्याकांडात सहभागी असल्याची कबुली दिली. त्याच्या अटकेप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना विशेष टास्क पथकाला कळविण्यात आले असून ट्रान्झिस्ट रिमांडवर दोघांना त्याच्या ताब्यात दिले जाईल, असे निरीक्षक दया नायक यांनी सांगितले.
गुडडन त्रिवेदीवर अनेक गंभीर गुन्हेविकास दुबेचा जवळचा साथीदार असलेल्या गुडडन त्रिवेदीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2001 साली चोबेपूर पोलीस ठाण्यात तत्कालिन राजमंत्री सौरभ शुक्ला यांच्या हत्येत सहभागी होता.त्याच्या खून,हत्येचा प्रयत्न, खंडणीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेतत्रिवेदीचाही एन्काउंटर होणार का?गँगस्टर विकास दुबे हा उज्जेनमध्ये पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशला घेऊन जात असताना काही तासामध्ये त्याचा एन्काऊटर करण्यात आला. त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.त्यामुळे दुबे गँगचे सर्व फरारी साथीदार हादरले आहेत. त्यांनाही आपला 'गेम' होण्याची भीती वाटत आहे. त्रिवेदी व त्याच्या साथीदाराला अटक केल्यानंतर त्यांना घेऊन जाताना 'एन्काऊटर' होतो का ते सुखरूप पोहचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सोशल मीडियावरही हा विषय चर्चेचा बनला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य
किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ
मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...
नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं