शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पिकींची अखेरची रात्र! साकिबसोबत जेवण केले अन् त्यानंतर...; डायरी रहस्य उलगडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 7:02 PM

हत्येचा आरोप करत कुटुंबीयांनी मृतदेह पोलिस ठाण्याबाहेर ठेवून गोंधळ घातला.

गाझियाबाद -  उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील वैशाली येथे एका मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा २३ वर्षीय जिम रिसेप्शनिस्टचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला. पिंकी गुप्ता असं या तरुणीचे नाव असून ती गेल्या चार वर्षांपासून साकिब नावाच्या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पिंकीच्या कुटुंबीयांनी साकिबवर हत्येचा आरोप केला असून तो घटनेनंतर फरार झाला होता.

पिंकीच्या कुटुंबीयांनी मृतदेह पोलिस ठाण्याच्या बाहेर ठेवला

पोलिसांनी सांगितले की, पिंकी दिल्लीतील गाझीपूर येथील रहिवासी साकिब खानसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. घटनेनंतर आरोपीने खोलीला कुलूप लावून पळ काढला. हत्येचा आरोप करत कुटुंबीयांनी मृतदेह पोलिस ठाण्याबाहेर ठेवून गोंधळ घातला. पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप करत पालक व इतर लोकांनी गोंधळ घातला. आपल्या मुलीला घरी परत यायचे आहे पण तरुणाने तिला धमकावले आणि जाऊ दिले नाही असा आरोप तिच्या आईने केला. सुमारे अडीच तास नातेवाइकांनी पोलिस ठाण्याबाहेरच थांबले.

दोघेही चार वर्षे एकत्र राहिले

गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पथकाने घटनास्थळ गाठून घटनेचा तपास केला. पोलिसांच्या तपासात वैशाली येथे राहणारी पिंकी जीममध्ये रिसेप्शनिस्ट असल्याचे निष्पन्न झाले. जिममध्येच तिची गाझीपूरमधील एका तरुणाशी ओळख झाली. वैशाली येथे भाड्याच्या खोलीत दोघे चार वर्षांपासून एकत्र राहत होते. गुरुवारी रात्री दोघांनी एकत्र जेवण केले. दरम्यान, साकिब खोली बंद करून बाहेर गेला. रात्री उशिरा शेजाऱ्याने खोलीत मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेला पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली.

डायरी महत्त्वाच्या गोष्टी उघड करू शकते

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेतला. घटनास्थळावर एक डायरी आणि मुलीचा फोन सापडला आहे. पिंकीने तिच्या डायरीत साकिबकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती लिहिली आहे. मात्र, याची पुष्टी होणे बाकी आहे. सध्या तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंकीच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आल्याचे एसीपी स्वतंत्र सिंह यांनी सांगितले. आरोपीची चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतिक्षा आहे.

पिंकीचे वडील फळविक्रेते

जिम रिसेप्शनिस्ट पिंकीचे वडील राजू गुप्ता आपल्या कुटुंबासह वैशाली सेक्टर-३ मध्ये राहतात. ते पश्चिम दिल्लीतील हसन पार्क येथे राहत होते आणि पाच वर्षांपूर्वी वैशाली येथे आले होते. फळे विकून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आईने आरोपीवर तिची मुलगी पिंकीची हत्या केल्याचा आरोप केला असून आरोपी साकिबला फाशी देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी