आर्णी (यवतमाळ): तालुक्यातील सुकळी येथे वडील व मुलावर गावातीलच व्यक्तिकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये मुलगा सूर्यकांत साहेबराव वारसवाड वय (25 वर्ष ) हा जागीच ठार झाला, तर वडील साहेबराव नामदेव वारसवाड जे गंभीर जखमी झाले.
त्यांना यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. सोमवारी सायंकाळी आर्णी- माहूर रोडवरील सुकळी गात ही घटना घडली. हल्यायामागील नेमके कारण कळू शकते नाही. आर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदर घटना साडे सात वाजता घडली आहे. मारेकरी व मृतक हे शेजारी शेजारीच राहतात. गणेश रामभाऊ मोरेश्वर(25) असे हल्लेखोराचे नाव आहे. शुल्लक वादातून घटना घडल्याचे गावकरी सांगत आहेत.
महत्वाचे म्हणजे आरोपीचे पुढील १५ ते २० दिवसांनी लग्न होणार होते.