मुंबई - ओला, उबर चालकांच्या संपादरम्यान चार - पाच ओला, उबर चालकांनी संपात सहभागी न झालेल्या एकाच मारहाण केली होती. या मारहाणीनंतर भांडुप पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. या चार आरोपींपैकी एका आरोपीचं नाव अशोक शर्मा असं असून त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती असून तळोजा कारागृहात ठेवलं होतं. मात्र, अशोक आजारी होता. त्यामुळे योग्य उपचार कारागृह प्रशासनाने न दिल्याने त्याचा कोठडीत मृत्यू झाला असल्याचे त्याच्या नातेवाईकांना आरोप करत भांडुप पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे.
काल रात्री ९ वाजताच्या सुमारास तळोजा कारागृहात अशोक मिश्राचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोक हा भांडुपमध्ये श्रीराम पाडा येथे राहत होते. त्याला डायबॅटिसचा त्रास होता. त्यासाठी अशोकला नेहमी इन्सुलिन सुरु होत. मात्र, कारागृह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने मला माझा मुलगा गमवावा लागला असल्याचे अशोकच्या आईने सांगितले.