लखनऊ - गेल्या ७० दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशाच्या प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चवेळी दिल्लीच्या अनेक भागांत हिंसाचार झाला. पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. ट्रॅक्टर रॅलीला लागलेल्या हिंसक वळणामुळे एका तरुणाचा नाहक मृत्यू झाला. मात्र, काल झालेल्या हिंसाचार प्रकरणातील ट्रॅक्टर रॅलीत सामील झालेल्या उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याचा दिल्लीच्या आयटीओ भागात मृत्यू झाला होता, तर मृत्यू गोळीबारात झालेला नाही असा आंदोलनात सामील झालेल्या काही आंदोलकांनी काल दावा केला, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी आज सांगितले. ट्रॅक्टर अपघातात जखमी झाल्याने मृत्यू झाल्याचं २६ वर्षीय व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे.
दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांवर केला गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अविनाश चंद्र यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “शवविच्छेदन अहवालात स्पष्ट केले आहे की, त्याला गोळी लागलेला नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर पलटल्यानंतर त्याला झालेल्या गंभीर जखमेमुळे मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनानंतर उघडकीस आले आहे. काल प्रसिद्ध झालेल्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांच्या दिशेने निळा ट्रॅक्टर चालवणारा व्यक्ती पोलिसांच्या बॅरिकेट्सच्या दिशेने ट्रॅक्टर येताना दिसत होता,त्यामुळे पोलिसांना अडथळा निर्माण झाला होता. वेगाने येणारा ट्रॅक्टर दोरखंड, बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. काल अपघातग्रस्त जखमांमुळेच व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले होते, तर काही आंदोलकांनी दावा केला होता की गोळ्या घालून ठार केले आहे.
राष्ट्रीय राजधानीपासून १८० कि.मी. अंतरावर रामपूर येथील नवरित सिंग असे या मृत व्यक्तीचे नाव असून नुकतेच तो ऑस्ट्रेलिया येथून मूळ गावी परत आला होता. तेथे त्यांची पत्नी विद्यार्थिनी आहे. मंगळवारी तो तीन केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनात सामील झाले होता. एका शेजाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, “आम्ही परेडमध्ये सहभाग घेण्यासाठी एकत्र आलो होतो, पण हे कधी घडले हे मला माहित नव्हते.”हे तीन कायदे रद्द करावे या मागणीसाठी 40 शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. संघटनांनी मान्य केल्याप्रमाणे ही रॅली सकाळी ११ वाजता सुरू होणार होती आणि दिल्लीच्या सीमेवरुन जाणार होती. ट्रॅक्टर व इतर वाहनांवरील हजारो शेतकर्यांनी सकाळी 8 वाजेपर्यंत अनियोजित मार्गांद्वारे राजधानीत घुसखोरी सुरू केली, बॅरिकेड्स खाली पाडले आणि पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.