धारणी (जि. अमरावती) : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेला निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याची सलग दुसरी रात्र धारणी ठाण्याच्या कोठडीत गेली. मात्र, पोलीस कोठडीदरम्यान त्याने पोलिसांशी असहकार्याची भूमिका घेतली असून, तो तोंडातून ‘ब्र’ देखील काढत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. बाला याला अमरावती ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ९ च्या सुुमारास नागपूर रेल्वे स्थानकाहून ताब्यात घेऊन धारणी पोलिसांकडे सुपूर्द केले होते. त्यामुळे शुक्रवारची रात्र त्याला धारणी पोलीस ठाण्यात काढावी लागली. शनिवारी त्याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली. त्याची रविवारची रात्रदेखील सामान्य कैद्याप्रमाणे पोलीस कोठडीत जाणार आहे. त्याला शनिवारी दुपारी दोननंतर धारणी ठाण्यात आणण्यात आले. तेथे सामान्य कैद्याप्रमाणे त्याला ठेवण्यात आले होते. जेवायला शासकीय डबा देण्यात आला. त्यानेही इतर मागणी केली नाही. पोलीस कोठडीजवळ ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी एक अधिकारी व चार पोलीस कर्मचारी असे पाच जण तैनात केले आहेत. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण गुगामाल वन्यजीव विभागाचे कार्यालय चिखलदरा येथे असून, विनोद बालाचे शासकीय निवासस्थानसुद्धा तेथेच आहे. कार्यालयातून कागदपत्रे व निवासस्थानाहून त्याचा लॅपटॉप व गुन्ह्याशी संबंधित इतरही काही वस्तू जप्त करण्याकरिता त्याला रविवारी दुपारी चिखलदरा येथे नेण्यात आले.
घटनेचा तपास महिला एसडीपीओंकडे nया प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे यांच्याकडे होता. ते ३१ मार्चला सेवानिवृत्त होणार आहेत. nदरम्यान, या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांची मागणी झाल्याने विशेष महिला पोलीस तपास अधिकारी म्हणूनमोर्शीच्या उपविभागीय अधिकारी पूनम पाटील यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आलाआहे.