मुंबई - सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज अँगलने सुरु असलेल्या तपासासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजच्या चौकशीसाठी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणला शनिवारी सकाळी १० वाजता एनसीबी कार्यालयात पोचली आहे. त्यानंतर तिची तिची मॅनेजर असलेल्या करिष्माच्या समोर बसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दीपिकाला वेगळ्या खोलीत बसवण्यात आलं. दीपिकामागोमाग अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात पोहचल्या. काल रकुल प्रीत सिंगची चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार रकुल प्रीतने ड्रग्जप्रकरणी सर्व दोष रिया चक्रवर्तीवर ठेवला. दरम्यान धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितीज प्रसादची एनसीबीने २० तासांपेक्षा जास्त चौकशी केली. काल रात्री त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. आज एनसीबीने दीपिकाचा फोन देखील जप्त केला असल्याची माहिती आज तकने दिली आहे. एनसीबीने सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीच्या एक्सचेंज बिल्डिंगमधील कार्यालयात बोलावलं आहे. साराचे बॉडीगार्डही सुरक्षा व्यवस्था तपासून गेले. दुपारी १२. ३० च्या सुमारास सारा एनसीबीच्या कार्यालयात पोहचली आहे. एनसीबी ऑफिसला जाण्यापूर्वी सारा आणि श्रद्धा दोघीही आपआपल्या वकिलांशी बोलल्या. दुसरीकडे एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये दीपिका पादुकोणची चौकशी केली जात आहे. मीडियाला टाळण्यासाठी दीपिकाने गेस्ट हाऊसजवळील एका पंचतारांकित हॉटेलची रूम बुक केली होती. हॉटेलमधूनच ती थेट गेस्ट हाउसला पोहोचली. त्या हॉटेलमध्ये ती रणवीर सिंगसोबत होती असून ती लीगल टीमशी सल्लामतलज देखील रात्री करत असल्याची माहिती मिळत आहे. दीपिकाची करिष्मासोबत झालेल्या चौकशी एनसीबीने केलेल्या ड्रग चॅटच्या प्रश्नावर दीपिकाने ते ड्रग चॅट तिचंच असल्याचं कबुली दिली आहे. मात्र अन्य प्रश्नांची उत्तरे देताना दीपिकाने टाळाटाळ केल्याने एनसीबी समाधानकारक नाही आहे. आता सारा, श्रद्धाच्या चौकशीत काय खुलासे होणार हे लवकरच कळेल.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे
Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!
धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या
विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी