धक्कादायक! एकाच घरात राहत होते पती-पत्नी आणि तिचा प्रियकर, मग झालं असं काही की दोघांचा गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 06:06 PM2022-02-21T18:06:08+5:302022-02-21T18:07:02+5:30
Dehradun Crime News : आरोपीने दोन लोकांची इतक्या निर्दयीपणे हत्या केली की, फ्लॅटच्या भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. घटनेनंतर जेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं.
उत्तराखंडची (Uttarakhand) राजधानी देहरादूनमधून (Dehradun) हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अनैतिक संबंधातून दोन लोकांची हत्या करण्यात आली. ही घटना देहरादूनच्या विद्या विहार फेज टू मधील आहे. इथे एका फ्लॅटमध्ये दोन मृतदेह आढळून आल्याने सगळेच हैराण झाले. आरोपीने दोन लोकांची इतक्या निर्दयीपणे हत्या केली की, फ्लॅटच्या भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. घटनेनंतर जेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं.
सोबत राहत होते पती-पत्नी आणि प्रेमी
मीडिया रिपोर्टनुसार, विद्या विहारमधील एका बिल्डींगमध्ये महिला गीता (बदललेलं नाव) तिचा पती आणि तिचा कथित प्रियकर हरिद्वारी लाल सोबत राहत होते. शुक्रवारी अर्ध्या रात्री अडीच वाजता जेव्हा फ्लॅटमधून आवाज येत होते तेव्हा वरच्या मजल्यावर राहणारे गुरप्रीत खाली आले. तेव्हा रक्ताने माखलेल्या एका व्यक्ती दरवाजा उघडला आणि समोर दोन मृतदेह पडले होते.
यानंतर पोलीस आले तेव्हा आरोपी व्यक्ती हरिद्वारी लाल याला अटक करण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली तर त्याने हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपीने सांगितलं की, गीता आणि राजेंद्र यांना तोच या फ्लॅटमध्ये घेऊन आला होता. तोच या फ्लॅटचं भाडं भरत होती. आरोपीने मृतक राजेंद्रला ४० हजार रूपये उसणेही दिले होते.
रिपोर्टनुसार, आरोपी हरिद्वारी लाल मृत राजेंद्रच्या पत्नीवर अधिकार गाजवत होता आणि दोघांचं कथित प्रेमप्रकरणही होतं. आरोपीने राजेंद्री पत्नी गीतासोबत अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले होते. शुक्रवारी तो राजेंद्रसोबत दारू प्यायला आणि मग पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. बऱ्याच वेळाने भांडणं थांबलं तेव्हा ते झोपू लागले होते.
यादरम्यान हरिव्दारीने गीतासोबत जोर जबरदस्ती केली तेव्हा पतीसोबत गीताने त्याला मारहाण केली. यानंतर आरोपीने किचनमधून तवा आणला. तव्याने त्याने गीता आणि राजेंद्रवर हल्ला केला. दोघेही बेशुद्ध पडले होते. त्यानंतरही हरिव्दारी त्यांना मारत राहिला जोपर्यंत ते मरत नाहीत. सध्या पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहे.