Delhi Crime News : दिल्ली पोलिसांच्या नॉर्थ जिल्ह्यातील पोलिसांनी एका मोठी दरोड्याची केस सॉल्व केल्याचा दावा केला आहे. २ फेब्रुवारीला दिल्लीच्या कूचा महाजनी भागात एका व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लूट करण्यात आली होती. त्याच्याकडून १५ लाख रूपये कॅश आणि काही दागिने लुटण्यात आले होते. सुचना मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली होती. सुरूवातीला तर पोलिसांना काही सापडलं नाही पण नंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं.
फुटेजच्या आधारावर पोलिसांना लुटण्यासाठी वापरलेली स्कूटी सापडली आणि सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांची चौकशी दिल्लीच्या मौजपूरपर्यंत गेली. पण अजूनही आरोपी पोलिसांना सापडले नव्हते. यानंतर पोलिसांनी खबऱ्याची मदत घेतली. खबऱ्याकडून माहिती मिळाली की, तीन-चार तरूण दोन तीन दिवसांपासून लागोपाठ दारूच्या दुकानातून महागडी दारू विकत घेत आहेत. या माहितीच्या आधारावर पोलीस तरूण राहत असलेल्या घरी पोहोचले.
पोलिसांनी त्या घरी धाड टाकली तर दिसलं की एक आरोपी लाल शर्ट घालून होता. जो सीसीटीव्ही फुटेज मॅच करत होता. यानंतर पोलिसांनी तीन तरूणांची चौकशी सुरू केली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी चौकशी पुढे नेली. एक कोटी कॅश आणि दागिने मिळवले. आरोपी दरोडा टाकून देवाला खूश करण्यासाठी खाटू श्यामजीच्या दर्शनासाठी गेले होते. लुटलेल्या पैशातून त्यांनी एक लाख रूपये मंदिरात दान दिले.
या चोरांनी दिल्लीत चार मोठ्या चोऱ्या केल्या. आपल्या टार्गेटची शिकार करण्याआधी त्यांच्या नोकरांना पैसे देऊन आपल्या बाजूने करत होते. त्यांच्याकडून सगळी माहिती काढत होते. मग चोरी करत होते.