राजस्थानच्या (Rajasthan) अलवरमध्ये (Alwar Murder Case) एका महिलेच्या हत्येची केस सॉल्व झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीच्या एका मोठ्या कपडा व्यापाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनुसार, ज्या महिलेची हत्या करण्यात आली आहे तिचे उद्योगपतीसोबत अनैतिक संबंध (illicit relationship) होते आणि ती त्याच्या मुलाची ट्यूशन घेण्यासाठी त्याच्या घरी जात होती. मृत महिलेची ओळख प्रियंका बहल म्हणून पली आहे. ती दिल्लीच्या गांधीनगरमध्ये राहणारी होती.
१६ मार्चला अलवरच्या इन्द्रा वस्तीजवळच्या पुलाखाली एक पोत्यात बेवारस मृतदेह आढळून आला होता. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका पांढऱ्या प्लास्टिकमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
मेडिकल टेस्टमधून समोर आलं की, महिलेचा मृतदेह ४ ते ५ दिवस जुना आहे. हत्येचं गुपित उलगडण्यासाठी अधिकाऱ्यांनी पोलिसांची एक टीम तयार केली आणि चौकशी सुर केली. बरीच चौकशी केल्यावर महिलेचं नाव प्रियंका बहल असल्याचं समजलं. ही २९ वर्षीय महिला दिल्लीच्या गांधीनगरमध्ये राहणारी होती.
पोलिसांनी चौकशी केली तर समजलं की प्रियंका गांधीनगरच्या बॅंकेत पैसे काढायला गेली तर परत आलीच नाही. बरीच चौकशी केल्यावर पोलिसांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात वापरलेली कार सापडली. पोलिसांना हेही समजलं की, हत्या दिल्ली करण्यात आली आणि नंतर मृतदेहाची विल्वेवाट लावण्यात आली. यानंतर राजस्थानच्या पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने आनंद विहार, गांधी नगर, करावल नगर, गाझियाबादमध्ये चौकशी केली. हत्येचे आरोपी कपिल गुप्ता, सुनैना गुप्ता, राज किशोर आणि सचिन यांना अटक करण्यात आली.
जेव्हा आरोपींची पोलिसांनी चौकशी केली तर समजलं की, मृत महिला प्रियंका ट्यूशन टीचर होती आणि उद्योगपती कपिल गुप्ताच्या घरी मुलांना शिकवायला जात होती. यादरम्यान कपिल गुप्तासोबत तिचं अफेअर सुरू होतं आणि त्यांनी अनैतिक संबंधही ठेवले.
यानंतर प्रियंका उद्योगपती कपिल गुप्तावर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण तो आधीच विवाहित होता. यानंतर उद्योगपतीवर दबाव टाकून महिलेने ५० लाख रूपयांची मागणी केली. ज्यानंतर ब्लॅकमेल झाल्यावर कपिल गुप्ताने परिवार आणि नोकरांच्या मदतीने तिची हत्या करण्याचा प्लान केला.