नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या सरोजिनी नगर मेट्रो स्टेशनबाहेर सुटकेसमध्ये मिळालेल्या मृतदेहाबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणी मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी सुरुवात केली तेव्हा तपास अधिकाही हैराण झाले. या प्रकरणात समलैंगिक संबंध आणि त्याचसोबत ब्लॅकमेलिंग एँगलही समोर आला आहे. या प्रकरणात एका उद्योगपतीसह ३ लोकांना अटक केली आहे.
सूटकेसमध्ये पोलिसांना २२ वर्षाच्या युवकाचा मृतदेह सापडला. युवक बिझनेसमॅनकडे तो सेल्समॅन म्हणून काम करत होता. पोलीस म्हणाले की, दक्षिण दिल्लीतील एका प्रसिद्ध व्यवसायिकानं सेल्समॅनसोबत संबंध बनवले होते. काही काळ दोघांमध्ये सर्वकाही ठीक होते परंतु त्यानंतर सेल्समॅननं व्यवसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बिझनेसमॅनकडून पैसे लाटण्याचा त्याने प्लॅन बनवला. सेल्समॅनच्या त्रासाला कंटाळून बिझनेसमॅननं त्याचा काटा काढला.
CCTV फुटेज आढळले
युवकाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी अखेरच्या वेळी युवकाला बिझनेसमॅनसोबत पाहिलं. त्यानंतर त्या उद्योजकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याच्या जबाबावरुन पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कसून विचारल्यानंतर त्याने सर्वकाही पोलिसांसमोर सत्य सांगून टाकले. बिझनेसमॅनसोबत युवकाचे शारिरीक संबंध होते. त्यावेळी युवकाने संबंध बनवताना लपून व्हिडीओ बनवला. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने बिझनेसमॅनला ब्लॅकमेल करण्याचा डाव रचला. बिझनेसमॅन विवाहित होता आणि त्याला २ मुलं होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीनं तो घाबरला आणि युवकाच्या जाळ्यात अडकला.
युवकाच्या त्रासाला कंटाळून बिझनेसमॅननं त्याची हत्या करण्याचं ठरवलं. त्याने २ जणांना खुर्जा येथे बोलावलं. त्यानंतर व्यापाऱ्याने युवकाला सोबत घेत खुर्जा येथील गेस्ट हाऊसला पोहचला. त्याठिकाणी गळा दाबून युवकाची हत्या केली. त्यानंतर युवकाचा मृतदेह सूटकेसमध्ये टाकून सरोजिनी मेट्रो स्टेशनजवळ निर्जनस्थळी फेकून दिला. पोलिसांनी आता ३ जणांना अटक केली आहे. १९ जानेवारीलाच युवकाची हत्या करण्याचं ठरवलं परंतु प्रजासत्ताक दिनामुळे दिल्लीत कडेकोट बंदोबस्त होता. त्यामुळे २६ जानेवारीपर्यंत व्यापाऱ्याने वाट पाहिली.