शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

घरात एकटी कमावती होती दिल्ली दुर्घटनेतील 'ती' तरुणी, कुटुंबीय धक्क्यानं बिथरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 10:09 PM

दिल्लीच्या सुल्तानपुरी परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका २३ वर्षीय तरुणीला कारमधून नववर्षाच्या पार्टीसाठी भरधाव वेगानं जाणाऱ्या चौघांनी उडवलं

नवी दिल्ली-

दिल्लीच्या सुल्तानपुरी परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका २३ वर्षीय तरुणीला कारमधून नववर्षाच्या पार्टीसाठी भरधाव वेगानं जाणाऱ्या चौघांनी उडवलं आणि फरफटत नेलं. यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणीला दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. थोरल्या बहिणीचं लग्नं झालं आहे. अपघातात मृत्यू झालेली तरुणी घरात एकटी कमावणारी होती. तिच्या आईला किडनीचा आजार आहे. दोन्ही किडनी फेल झाल्या आहेत. 

धक्कादायक घटना! 23 वर्षीय तरुणीला कारने उडवलं अन् 4KM फरफटत नेलं; जागीच मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेली तरुणीच घराची आर्थिक आधार होती. तिच्याच पगारावर घर चालत होतं. ती एका इव्हेंट कंपनीमध्ये काम करत होती. ती आता या जगात नाही हे पचवणंच कुटुंबीयांना खूप कठीण जात आहे. एक भाऊ १३ वर्षांचा तर दुसरा ९ वर्षांचा आहे. वडिलांचं ८ वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. तर मोठ्या बहिणीचं लग्न झालं आहे. या घटनेनंतर तिच्या आईनं फक्त पोलीस ठाण्याचे डीसीपी यांच्याशी बातचित केली आहे. इतर कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत त्या सध्या नाहीत. 

परिचयातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास तरुणी बाहेर पडली होती. इव्हेंट कंपनीचं काहीतरी काम आहे सांगून ती घरातून निघाली होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास तिनं घरी फोनही केला होता आणि घरी रात्री उशिरा येणार असल्याचं कळवलं होतं. कुटुंबीयांनी तिला रात्री १० वाजता फोन केला होता. पण तिचा फोन बंद लागत होता. थेट सकाळी ८ वाजता दिल्ली पोलिसांकडून अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळाली. 

भरधाव वेगात कारनं तिला चक्क ४ किमी फरफटत नेलंराजधानी दिल्लीत नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली. एका तरुणीचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. सुल्तानपुरी ठाणे हद्दीतील कंझावाला परिसरात पाच मुलांनी तरुणीला कारनं धडक दिली आणि तिला जवळपास ४ किमी अंतरापर्यंत फरफटत नेलं. यात तरुणीचा मृत्यू झाला. तरुणी तिच्या स्कूटीवरुन घरी परतत होती. याच दरम्यान भरधाव वेगात पार्टीच्या धुंदीत कार चालवणाऱ्या या पाच मुलांनी तिला धडक दिली होती. 

कारनं ४ किमी फरफटत नेल्यानं तरुणीच्या शरीरावरचे सगळे कपडे फाटून गेले. तिच्या शरीराला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आणि घटनास्थळावरच तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या अपघाताचा जो फोटो समोर आला आहे तो इतका भयंकर आहे की कुणाचीही तो फोटो पाहण्याची हिंमत होत नाहीय. तरुणीचं संपूर्ण शरीर गंभीर जखमांनी भरलं आहे. नराधमांनी तिला इतकं फरफटत नेलं की तिच्या शरीरावर एकही कपडा शिल्लक राहिला नाही.

टॅग्स :Accidentअपघात