शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

पती बनला सैतान! उचललं थरकाप उडवणारं पाऊल; कुकर, सिलिंडरनं पत्नीचं डोक चिरडलं अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 3:59 PM

आरोपीने आत्मसमर्पण करताना पोलिसांना सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यामुळेच त्याने तिचा खून केला.

दिल्लीतील गोविंदपुरी परिसरातून गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक अन् थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका पतीने पत्नीचा खून केला. पतीने पत्नीची अशा पद्धतीने हत्त्या केली, जी ऐकून कुणाचाही थरकाप उडेल. एवढेच नाही, तर या घटनेनंतर आरोपी पतीने हत्येची कबुली देत ​​स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी पतीचे नाव आसिफ असे आहे तर पत्नीचे नाव शाहीन खान असे होते. 

आरोपीने आत्मसमर्पण करताना पोलिसांना सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीवर कुणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यामुळेच त्याने तिचा खून केला. त्याचा जबाब पीएस गोविंदपुरी येथे डीडी क्रमांक 14अ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.

आधी कुकरनं केला वार, मग सिलिंडरनं चिरडलं डोकं -आरोपी पतीने पोलिसांना सांगितले की, त्याने सर्वप्रथम पत्नीच्या डोक्यावर कुकरने वार केला. पण तिचा मृत्यू झाला नाही. मग त्याने चाकूने तिच्यावर हल्ला केला, यात तिचा मृत्यू झाला. मग त्याने जवळच असलेल्या सिलिंडरने पत्नीचे डोके चिरडले. यानंतर तो आत्मसमर्पण करण्यासाठी पोलिसांत पोहोचला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसdelhiदिल्ली