नवी दिल्ली : दिल्लीच्या महरौली विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या आपच्याआमदारावर मध्यरात्रीच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यामध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे.
नरेश यादव हे महरौली मतदारसंघातून काल पुन्हा निवडून आले आहेत. दिल्लीमध्ये भाजपाला टक्कर देत आपने सत्ता राखली असून काँग्रेस, भाजपाचा दारुण पराभव केला आहे. यादव हे निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांसह मंदिरातून घरी परतत होते. यावेळी किशनगढमध्ये त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आपने या हल्ल्याला दिल्लीच्या पोलिसांना जबाबदार धरले आहे.
आपचे प्रवक्ते संजय सिंह यांनी ट्विट करत या हल्ल्याची माहिती दिली आहे. महरौली आमदाराच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. अशोक मान यांनी खुलेआम हत्या करण्यात आली. ही दिल्लीतील अवस्था आहे, अशी टीका त्यांनी केली. यादव सुरक्षित असल्याचे समजते.
पोलिसांनी हा हल्ला प्रथम चौकशीत यादव यांच्यावर नसून तो त्यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यावर करण्यात आला होता. दोन गटांतील वादातून हे गँगव़ॉर असल्याचे पोलिसांनी सांगितले. मान नावाचा कार्यकर्ता ठार झाला असून त्यानेही याआधी दुसऱ्या गटावर गोळीबार केला होता असा संशय आहे. घटनास्थळी सहा ते सात बुलेट फायर केल्याच्या पुंगळ्या सापडल्या आहेत. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यादव यांनी भाजपाचे उमेदवार कुसुम खत्री यांचा 18181 मतांनी पराभव केला आहे.