नवी दिल्ली – रोहिणी नॉर्थच्या नाहरपूर गावात पत्नी आणि दोन चिमुकल्यांची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतकांमध्ये धीरज यादव(29), पत्नी आरती यादव(28), मुलगा हितेन(6) आणि अथर्व(3) समावेश आहे, पोलीस चौकशीत धीरजचा मोठा मुलगा बोलू शकत नव्हता तर छोटा मुलगाही दिव्यांग आहे, आईची मानसिक स्थिती ठिक नाही, याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये वाद होत असे, पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये धीरज जीवनाला कंटाळला असल्याचं उल्लेख आहे, पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे, यात धीरजने जीवनात काहीच उरलं नाही, तर भविष्यही अंधारात असल्याचं म्हटलं आहे, धीरजचे वडील महासिंह यांनी सांगितलं की, त्यांचे दोन्ही नातू दिव्यांग होते, छोट्या मुलाची आयुष्यभर सेवा करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्यामुळे धीरज चिंतेत होता. माझा मुलगा परिस्थितीचा सामना करू शकला नाही आणि आता सगळं काही संपलं असं महासिंह म्हणाले.
डीसीपी प्रणव तायल यांनी सांगितले की, महासिंहचं कुटुंब रोहिणीच्या नाहरपूर येथे राहते, ३ मजली इमारतीत तळाला महासिंह आणि त्यांच्या पत्नी सुदेश रानी आणि आई राहत होती, त्यांचा मोठा मुलगा नीरज पत्नी आणि दोन मुलांसह पहिल्या मजल्यावर राहायला आहे, तो बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये कामाला आहे, दुसऱ्या मजल्यावर धीरजचं कुटुंब राहत होतं, तो कंत्राटी गाडी चालक होता, गुरुवारी सकाळी पोलिसांना ही घटना समजली.
पोलिसांनी दरवाजा तोडून आत गेले असता पत्नी आरतीचा मृतदेह रक्त्ताच्या थारोळ्यात आढळला, हितेन आणि अथर्वही मृत अवस्थेत आढळले, धीरजचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. प्राथमिक अंदाजात धीरजने पत्नी आणि २ मुलांची हत्या करून गळफास घेतल्याचा संशय आहे, रुममध्ये एक चाकूही जप्त करण्यात आला. सुसाईड नोट आढळली, त्यात धीरज जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं. धीरजचे वडील महासिंह लष्करातून निवृत्त झाले आहेत, त्यांनी दोन्ही नातवंडावर लाखो रुपये उपचारासाठी खर्च केल्याचं म्हटलं. परंतु लहान मुलगा ठिक होणार नसल्याची चिंता धीरजला सतावत होती, त्यामुळे दोघा नवरा-बायकोमध्ये भांडणं व्हायची.
टीप – जर तुमच्या परिचयातील कोणीही मानसिकदृष्या तणावाखाली असेल तर नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँन्ड न्यूरो सायन्सशी संपर्क साधावा, याठिकाणी कॉल करून तुमची समस्या सांगू शकता, येथील डॉक्टर योग्य तो सल्ला देऊन यातून बाहेर काढतील, हेल्पलाईन नंबर – 08046110007