शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कोण आहे सुकेशपेक्षाही मोठा ठग मृणांक? ऋषभ पंतसह अनेक दिग्गजांना लावलाय चुना!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 2:28 PM

देशातील वेगवेगळ्या फाइव्ह स्टार होटेल्समध्ये थांबण्याचा शोक, मॉडेल्स आणि मुलिंसोबत मौजमस्ती करणे, व्हिडिओ बनवणे आणि फोटो काढणे, अशी त्याची ओळख. 

ताज हॉटेलमध्ये बिलाच्या नावावर फसवणूक, भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतची 1.63 कोटी रुपयांची फसवणूक, असे अनेक आरोप असलेल्या आणि लोकांना धोका देण्यात मास्टर असलेल्या 25 वर्षीय मृणांक सिंहला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तो हाँकाँगला पळून जाण्याच्या तयारीत असताना एअरपोर्टवर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. खरे तर, कधी आयपीएस अधिकारी, कधी माजी रणजी क्रिक्रेटर, तर कधी आयपीएलमध्ये मुंबईसंघाचा खेळाडू. याशिवाय, देशातील वेगवेगळ्या फाइव्ह स्टार होटेल्समध्ये थांबण्याचा शोक, मॉडेल्स आणि मुलिंसोबत मौजमस्ती करणे, व्हिडिओ बनवणे आणि फोटो काढणे, अशी त्याची ओळख. 

क्रिकेटर बनून हॉटेल ताजमध्ये थांबला -मृणांकला देशातील वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची आवड आहे. त्याने अनेक हॉटेल्समध्ये राहून तेथील मालक आणि व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे. हॉटेलमध्ये थांबल्यानंतर तो बिल न देताच निघून जातो. गेल्या वर्षी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात मृणांकविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. मृणांक सिंगवर 22 ते 29 जुलै 2022 या दरम्यान ताज हॉटेलमध्ये राहण्याचे अंदाजे 5.5 लाख रुपयांचे बिल न भरल्याचा आरोप आहे. तो क्रिकेटर म्हणून हॉटेलमध्ये थांबला होता.

मृणांकला बिल मागितले असता, त्याने एक खाजगी स्पोर्टस वियर कंपनी पैसे देणार असल्याचे सांगितले. यानंतर त्याने ऑनलाइन बिल भरल्याचे सांगितले, पण हॉटेलला हे पैसे मिळालेच नाही. हॉटेलने पुन्हा सिंह आणि त्यांचे व्यवस्थापक गगन सिंह यांच्याशी संपर्क साधला असता, क्रिकेटपटूचा ड्रायव्हर रोख घेऊन जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, कुणीही आले नाही. यानंतर सिंह यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्यात आला. मात्र त्याने दर वेळा खोटी आश्वासने. अखेर त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आधीही झाली होती अटक -लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मृणाक सिंगला मुंबई आणि पंचकुला पोलिसांनी यापूर्वीही अटक केली होती. मृणांकने नॉर्थ कॅम्पस कॉलेजमधून बी.कॉम केले आहे. त्यांनी राजस्थानमधून एमबीए केले. त्याच्यावर यापूर्वी मुंबईतील जुहू, हरियाणातील कर्नाल आणि पंजाबमधील मोहाली येथे तीन गुन्हे दाखल आहेत.

मोबाईलमध्ये काय काय आढळलं? -अतिरिक्त डीसीपींच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडून फसवणूक झालेल्या लोकांच्या यादीत हॉटेल, बार, रेस्टॉरंट, मुली, कॅब ड्रायव्हर, खाद्यपदार्थांची छोटी दुकाने आणि इतरही काही लोकांचा समावेश आहे. आरोपी, 2021 मध्ये हरियाणासाठी रणजी ट्रॉफी खेळल्याचा आणि मुंबई इंडियन्सकडून 2014 ते 2018 पर्यंत IPL चा भाग होता, असा दावा करत होता. एवढेच नाही, तर त्याच्या मोबाईलच्या प्राथमिक तपासणीत तो तरुण महिला मॉडेल्स आणि मुलींशी परिचित होता. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो आढळून आल्याचेही, संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

टॅग्स :Rishabh Pantरिषभ पंतfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhotelहॉटेल