शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला! दिल्लीतून 2000 जिवंत काडतुसे जप्त, सहा जणांना अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:42 PM

Delhi Police : 2000 जिंवत काडतुसे कोणाला देणार होते. याचा वापर कुठे केला जाणार होता. यासंबंधींची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. 

नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी 2000 जिवंत काडतुसे सापडली आहेत. यासोबतच दिल्लीत काडतुसे पुरवणाऱ्या सहा आरोपींनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पूर्व दिल्ली पोलिसांनी पुरवठादाराला आनंद विहार परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, आरोपी ही 2000 जिंवत काडतुसे कोणाला देणार होते. याचा वापर कुठे केला जाणार होता. यासंबंधींची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. 

15 ऑगस्ट निमित्त दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. संपूर्ण दिल्लीसह लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आनंद विहार परिसरात दोन संशयितांकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून संशयिताची झडती घेतली असता त्यांच्याकडून 2000 जिवंत काडतुसे असलेल्या दोन पिशव्या जप्त केल्या. यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्यासह इतर साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. सध्या या सर्वांची चौकशी सुरू आहे.

10 हजार पोलीस तैनात करण्यात येणार! यंदा संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या आनंदी वातावरणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्थाही करण्यात येत आहे. यावेळी 15 ऑगस्टला लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी 10 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, 15 ऑगस्टपूर्वीच संपूर्ण दिल्लीला अलर्टवर ठेवण्यात आले आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा स्वतः विविध गुप्तचर संस्था आणि सुरक्षा आस्थापनांच्या प्रमुखांसह सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट!स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना दिल्लीत हल्ला करण्याचा कट रचू शकतात. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी गुप्तचर यंत्रणेने दिल्ली पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 10 पानी रिपोर्टमध्ये गुप्तचर यंत्रणेने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, जैश या दहशतवादी कटाची योजना आखत असल्याची माहिती दिली आहे. आयएसआयला त्यांना लॉजिस्टिक मदत देऊन स्फोट घडवायचा आहे, या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यामध्ये अनेक नेत्यांसह बड्या संस्थांच्या इमारतींना लक्ष्य केले जाऊ शकते.

टॅग्स :delhiदिल्लीIndependence Dayस्वातंत्र्य दिनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी