शरजील इमाम याच्याविरुध्द दिल्लीच्या साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शरजील इमामवर देशद्रोही भाषण करून हिंसाचाराला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला आणि एनआरसी च्या विरोध करणाऱ्या मोर्चात भडकाऊ भाषण करणाऱ्या जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला पोलिसांनीअटक केली आहे. मात्र त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली होती. भारताला इस्लामिक देश करण्याचं स्वप्न आहे असं शरजीलने सांगितले होते. दिल्लीपोलिसांच्या चौकशीत हे समोर आलं होतं. दिल्ली पोलिसांनी त्याला २ जानेवारी रोजी बिहारच्या जहानाबाद येथून अटक केली.हिंसा भडकवल्याचा आरोपयाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदविला होता. इमाम यांना बिहारच्या जहानाबाद येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर हिंसा भडकवण्याचा आरोप होता. इमामने केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे भाषण 13 डिसेंबर रोजी देण्यात आले. तपासादरम्यान, पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी इमामविरोधात आयपीसीच्या कलम 124 ए (देशद्रोह) आणि 153 ए (धर्म, भाषा, वंश इत्यादींच्या आधारे लोकांमध्ये द्वेष पसरवणे) लावले होते.
दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, १५ डिसेंबर रोजी जामिया मिलियाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला आणि एनआरसीच्या विरोधात न्यू फ्रेंड्स कॉलनी आणि जामिया येथे मोर्चा काढला आणि त्या दरम्यान गंभीर हिंसाचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या काळात जाळपोळ व हिंसाचार झाला आणि दगडफेकही करण्यात आली. यामुळे सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दंगल, हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यासंबंधी गुन्हे दाखल केले होते. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एफआयआरच्या आधारे जामियामध्ये हिंसा भडकवल्याबद्दल शरजील इमामला अटक करण्यात आली होती.