राजस्थानचे मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याच्याविरोधात एका २३ वर्षीय महिलेने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपाप्रकरणी दिल्लीपोलिसांचे पथक रविवारी जयपूरला पोहोचले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "फरार असलेल्या जोशीला पकडण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांचे पथक जयपूरला पोहोचले आहे. त्याला शोधण्यासाठी आमचे पथक कार्यरत आहे."पोलिसांच्या पथकाने मंत्र्यांच्या शहरातील दोन निवासस्थानांना भेट दिली. त्यांचा मुलगा मात्र सापडला नाही. "आमची टीम फरार असलेल्या रोहित जोशीचा शोध घेत आहेत," असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी रोहित जोशीला 18 मे पर्यंत त्यांच्यासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले. अधिकाऱ्यांनी समन्सची प्रत त्याच्या घराच्या भिंतीवर चिकटवली.
राजस्थानचे मंत्री आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. रोहित जोशीच्या शोधात दिल्ली पोलिसांचे एक पथक राजस्थानच्या जयपूरला पोहोचले आहे. राजस्थान सरकारच्या मंत्र्यानेही या प्रकरणाची मीडिया ट्रायल योग्य नसल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे 15 पोलिसांचे पथक जयपूरला पोहोचले आहे.रोहित जोशीविरुद्ध दिल्लीतील सदर बाजार पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. दिल्ली पोलिसांचे पथक तीन वाहनांतून जयपूरला पोहोचले आहे. दिल्ली पोलिसांचे पथक बलात्कार आरोपी रोहित जोशीलाही अटक करू शकते, असे बोलले जात होते. मात्र पोलिसांना रोहितचा शोध घेता आला नाही. सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात दिल्ली पोलिसांचे पथक रोहित जोशीचा शोध घेत आहे. दिल्लीतील सदर बाजार पोलिस ठाण्यात एका तरुणीने रोहित जोशीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. पीडितेने रोहितवर मारहाण, ब्लॅकमेल आणि गर्भपाताचा आरोपही केला आहे.पीडितेने बलात्काराचा आरोप केला होतापीडितेने दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये ही माहिती दिली होती की, ती 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित जोशीच्या संपर्कात आली होती. आरोपानुसार, 2021 मध्ये रोहितने मुलीला सवाई माधोपूर येथे नेले आणि ड्रिंकमध्ये नशा मिसळून तिला प्यायला दिले. यानंतर रोहितने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला, फोटो काढले. हे व्हिडीओ आणि फोटोने तिला ब्लॅकमेल करून रोहितने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.