दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय मुलीची अधिक वेळा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आणि नंतर तिला दगडाने ठेचून मारण्यात आले. याच दरम्यान रस्त्याने जाणाऱ्यांनी आरोपीला रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या निर्घृण हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. आरोपी साहिलने दिल्ली पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या चौकशीत साहिलने आपल्याला गुन्हा केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं आहे. साहिलने सांगितले की, घटनेच्या वेळी तो खूप संतापला होता. यामागचे कारण असेही आहे की, अनेक दिवसांपासून मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. मुलीला साहिलसोबत ब्रेकअप करायचे होते, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच तिने साहिलपासून दूर व्हायला सुरुवात केली, त्य़ाला हे सहन होत नव्हतं.
मुलीची हत्या केल्यानंतर साहिलने रिठाला परिसरात चाकू फेकल्याचे पोलिसांनी सांगितले. साहिलला ताब्यात घेऊन पोलीस पुरावे गोळा करणार आहेत. चाकू फेकल्यानंतर साहिल बस पकडून बुलंदशहरला गेला. रात्रभर झालेल्या चौकशीत साहिलने पोलिसांना सांगितले की, तिच्या हत्येचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही. तिला माझ्यासोबतचे नाते संपवून तिच्या जुन्या प्रियकराकडे जायचे होते.
या घटनेच्या समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये साहिलचा संताप स्पष्टपणे दिसत आहे. साहिल सतत एकामागून एक तरुणीवर चाकूने हल्ला करत आहे. दरम्यान, एका व्यक्तीने त्याला समजावण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो मानत नाही. चाकूने हल्ला केल्यानंतर साहिलने शेजारी पडलेला मोठा दगड उचलून मुलीच्या चेहऱ्यावर मारला. यावरून साहिलला खूप राग आला होता याचा अंदाज लावता येतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.