शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, महिलेचा प्लॅन पाहून चक्रावून गेले पोलीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 11:18 AM

दिल्लीच्या मुनिरका भागात ३२ वर्षीय वसी अहमद आपल्या पत्नीसोबत राहत होता. गेल्या ५ एप्रिलला पोलिसांनी वसीचा मृतदेह ताब्यात घेतला होता.

दिल्ली पोलिसांनी एका ब्लाइंड मर्डर केसचं रहस्य उलगडत आश्चर्यजनक खुलासा केला आहे. ३ दिवसांआधी पोलिसांनी पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पण त्याच्या मारेकऱ्यांचा काही सुगावा लागत नव्हता. मग असं काही झालं की, हत्येचा पुरावा स्वत: पोलिसांपर्यंत पोहोचला. या केसमध्ये दुसरं कुणी नाही तर त्या व्यक्तीची पत्नीच व्हिलन निघाली. पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली.

दिल्लीच्या मुनिरका भागात ३२ वर्षीय वसी अहमद आपल्या पत्नीसोबत राहत होता. गेल्या ५ एप्रिलला पोलिसांनी वसीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यानंतर पोलीस चौकशी करू लागले होते. पोलिसांची टीम मृतदेह ताब्यात घेतल्यावर मारेकऱ्यांचे पुरावे शोधण्यासाठी त्याच भागात चौकशी करत होते. (हे पण वाचा : गावाबाहेरील जंगलात फिरत होती प्रेमी जोडपी, ग्रामस्थांनी पकडले आणि...)

समयपूर बादली पोलीस स्टेशनचे एसएचओ आशीष दुबे यांच्यानुसार, जेव्हा त्यांची टीम घटनास्थळी पुरावे जमा करत होती. तेव्हा तेव्हा तिथे एक महिला संशयास्पदपणे इतके-तिकडे फिरताना दिसली. पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिला थांबवून विचारपूस केली. पण तिचं बोलणं विचित्र होतं. त्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली तर धक्कादायक खुलासा झाला. ज्यामुळे ही हत्येची केसच सॉल्व झाली.

ही महिला दुसरी-तिसरी कुणी नसून मृत वसी अहमदची पत्नी गुलफिशा होती. ते दोघेही साऊथ दिल्लीच्या मसाज पार्लरमध्ये काम करत होते. एक दिवस गुलफिशाची भेट मुकेश नावाच्या तरूणासोबत झाली.  दोघांची मैत्री झाली. नंतर ते एकमेकांच्या जवळ आले. इतके जवळ की, दोघांनी मिळून वसीला मार्गातून बाजूला करण्याचा निर्णय घेतला. कारण तो त्यांच्या नात्यात अडचण ठरत होता. (हे पण वाचा : अश्लील छायाचित्र पतीला पाठवण्याची महिलेला धमकी; प्रियकराविरोधात गुन्हा दाखल)

आउटर नॉर्थ दिल्लीचे डीसीपी राजीव रंजन म्हणाले की, ४ एप्रिलला गुलफिशा आणि मुकेशने साउथ दिल्लीच्या महिपालपूरमध्ये एका हॉटेलमध्ये २ रूम बुक केल्या होत्या. एक रूममध्ये गुलफिशा आपल्या पतीसोबत होती. तर दुसऱ्या रूममध्ये मुकेश त्याच्या मित्रांसोबत होता. दरम्यान गुलफिशाने वसीला भरपूर दारू पाजली. तो नशेत टल्ली झाला. त्यानंतर गुलफिशाने मुकेशला बोलवलं.

मुकेश आपल्या साथीदारांसोबत त्यांच्यां रूममध्ये पोहोचला आणि सर्वांनी मिळून वसीची हत्या केली. हत्येसाठी आरोपींनी दगड आणि धारदार हत्यारांचा वापर केला. त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह कसातरी हॉटेलच्या बाहेर काढला आणि त्याला समयपूर बादली भागात फेकून फरार झाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांना त्याचा मृतदेह आढळून आला. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी