नवी दिल्ली - दिल्लीपोलिसांच्या विशेष सेलने आयबी अधिकारी अंकित शर्माच्या हत्येप्रकरणी आरोपी सलमान याला काल अटक केली. आरोपींनी अंकित शर्माचे सर्व कपडे फाडले आणि त्याला ताहिर हुसेन यांच्या घरी मारत मारत नेले. ताहिर हुसैन हा आपचा निलंबित नगरसेवक असून त्याला देखील पोलिसांनीअटक केली आहे. तसेच त्याच्यावर चाकू व काठ्यांनी हल्ला केला. दिल्ली पोलिसांचे विशेष सेल आरोपी सलमानची कसून चौकशी करत आहे. या चौकशीत सलमानने गौप्यस्फोट करत अनेक खुलासे केले आणि अंकित शर्माची निर्घृण हत्या कशी केली याबाबत माहिती दिली. ४०० सपासप वार अंकितवर केले असल्याचे सलमानने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
Delhi Violence : "या" पाच नावाने ओळखला जात होता अंकित शर्मा हत्येतील दुसरा आरोपी
खरंच अंकित शर्मा यांची हत्या करणाऱ्यांनी दिले 'जय श्रीराम'चे नारे?... जाणून घ्या सत्य
Delhi Violence: शरीरावर चाकूचे शेकडो वार करून अंकित शर्माला संपवले, पोस्टमार्टेममधून झाले उघड
अंकित शर्माच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावेही आरोपींनी उघड केली आहेत. चांद बाग येथील रहिवाशी अंकित शर्मा हा आयबीमध्ये नोकरीस होता. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर अंकित शर्माचा मृतदेह जोहरीपूर आणि भागीरथी विहार या ओढ्यात सापडला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित शर्माच्या अंगावर ४०० हून अधिक चाकूचे वार आढळून आले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनला अटक केली. परंतु ताहिर हुसैनच्या चौकशीदरम्यान अंकित शर्माचा हत्येत त्याचा हात नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.
अंकित शर्माच्या हत्येप्रकरणी विशेष सेलचे एसीपी ललित मोहन नेगी आणि हृदय भूषण यांच्या पथकाने काल गुरुवारी दुपारी सलमानला अटक केली आहे. सलमानने चौकशीदरम्यान सांगितले की, काही लोक अंकित शर्मा यांना मारत घेऊन आले. त्यानेही अंकित शर्मावर चाकूने हल्ला करण्यास सुरवात केली. त्याने अंकित शर्मावर सात ते आठ वेळा चाकूने वार केले. अंकित शर्मावर बरेच लोक चाकूने हल्ला करीत होते. पोलीस अधिकाऱ्याला सलमानने सांगितले की, आरोपींनी अंकितचे संपूर्ण कपडे फाडले. सलमानने चार ते पाच आरोपींची नावे उघड केली आहेत.