नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचारादरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या शाहरुखला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीत शाहरुख एक मॉडेल असल्याचे उघडकीस आले. तसेच तो टिकटॉकवर व्हिडिओ देखील बनवतो. त्याने मुंगेरमध्ये बनवलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला. त्याने कट रचून गोळीबार केला की त्याच्याकडून अचानक हा गोळीबार झाला याचा शोध घेण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत.
Delhi Violence: पोलिसांवर पिस्तुल रोखून ८ राऊंड फायर करणाऱ्या शाहरुखला अटक
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अजितकुमार शिंगला यांनी सांगितले की, त्याने तीन गोळ्या झाडल्या. आरोपीकडून पाच गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पिस्तूल सेमी ऑटोमॅटिक आहे. शाहरुखला जिमचीही आवड आहे. बीए द्वितीय वर्षापर्यंत त्याने शिक्षण घेतले आहे . म्युझिक व्हिडिओ देखील त्याने बनवला आहे. गोळीबारानंतर दिल्लीहून पळून तो जालंधरला गेला. तेथून बरेली व नंतर शामलीला गेला. तेथे तो एका मित्राकडेच राहिला होता. शामली बसस्थानकाकडे जात असताना तेथून पोलिसांनी त्याला पकडले. शामलीमधील ज्या ठिकाण त्याला राहण्यास मदत केली त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील अटक केली जाईल असं पुढे शिंगला यांनी सांगितले.सुरुवातीच्या चौकशीत तो एकटाच आंदोलनात सहभागी होण्यासाठी आला असल्याचे उघडकीस आले. त्याला कोर्टात हजर करायचे असून त्यानंतर उर्वरित लोकांची चौकशी केली जाईल. शाहरुखने पळ काढण्यासाठी एस्टीम गाडीचा वापर केला होता. आम्ही आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनशी त्याचा काही संबंध आहे का? याची चौकशी करू. त्याच्याविरूद्ध भा. दं. वि. कलम 186, 353, 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती देखील शिंगला यांनी दिली.
धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेखघटनेनंतर पळ काढल्यानंतर तो प्रथम कनॉट प्लेसमधील पार्किंगमध्ये झोपला होता. याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याच्या वडिलांवर अमली पदार्थांच्या प्रकरणात आरोपी आहे. दिल्लीच्या झाफराबादमधील हिंसाचारादरम्यान गोळीबार केलेल्या मोहम्मद शाहरुखला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आहे. शाहरुखने दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्यावर गोळी झाडली आणि ८ राऊंड फायर केले. दीपकने पिस्तूल काढून गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो कुटुंबासमवेत पळून गेला.