लातूर : हाॅटेलच्या विद्युत मीटरमधून वीज प्रवाह काढून थेट वीज प्रवाहाचा वापर करुन वीजेची चाेरी केल्याच्या प्रकरणात तक्रारदार वीज ग्राहकाकडे तीस हजाराची लाच मागितल्याप्रकरणी लातूर येथील महावितरण शाखा क्रमांक १ च्या सहायक अभियंत्याविराेधात गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली.
लातूर येथील एका हाॅटेलचालकाने विद्युत मीटरमधून वीज प्रवाह काढून ताे थेट वीज प्रवासहाचा वापर करुन वीजेची चाेरी केल्याची प्रकरण घडले. याबाबत कारवाई न करण्याच्या कामासाठी महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता शेख मन्सूर नजीर याने तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार हाॅटेलचालकाने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची तडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निषपन्न झाले. लातूर शहरातील नांदेड राेडवरील गरुड चाैकात असलेल्या महािवतरणच्या कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार आणि बुधवारी सापळा लावला. यावेळी तक्रारदार हाॅटेलचालक वीजग्राहकाने सदर लाचेची रक्कम देण्यासाठी कार्यालयात गेले हाेते. मात्र, संशय आल्याने ३० हजारांची लाच स्वीकारण्यास सहायक अभियंता शेख मन्सूर नजीर याने जाणिवपूर्वक टाळाळाट केली. याबाबत लातूर शहरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सहायक अभियंता शेख मन्सूर नजीर याच्याविराेधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलीस उपाधीक्षक माणिक बेंद्रे यांनी दिली. सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे पाेलीस निरीक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, सहायक पाेलीस उपनिरीक्षक संजय पस्तापुरे, पाेलीस हवालदार लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, माेहन सुरवसे, शिवकांता शेळके, संताेष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, दीपक कलवले, रुपाली भाेसले, राजू महाजन यांच्या पथकाने केली.