शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

भास्करच्या खात्म्यामुळे नक्षल चळवळीला हादरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 8:38 AM

नक्षलवाद्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान तीव्र करत पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवाईत सोमवारी पाच नक्षलवादी ठार झाले.

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान तीव्र करत पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवाईत सोमवारी पाच नक्षलवादी ठार झाले. त्यात दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेंबर ऋषी रावजी उर्फ पवन उर्फ भास्कर हिचामी (४६) हासुद्धा मारला गेला. तब्बल दीडशे गुन्ह्यांची नोंद असलेल्या एकट्या भास्करवर २५ लाखांचे बक्षीस होते. त्याच्यासारख्या जहाल नक्षली नेत्याचा मृत्यू नक्षल चळवळीसाठी मोठा हादरा आहे. स्पेशल झोनल कमिटी मेंबर असलेला नक्षल नेता पहिल्यांदाच पोलिसांच्या गोळीचा शिकार ठरला. (The demise of Bhaskar shook the Naxal movement)या चकमकीत दोन महिला नक्षल्यांचाही मृत्यू झाला आहे. सर्व मृत नक्षलवाद्यांवर मिळून एकूण ४१ लाखांचे बक्षीस होते. गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रपरिषदेत या घटनेची सविस्तर माहिती दिली. कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी घातपाती कारवायांचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एएसपी (अभियान) मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात अभियान तीव्र करण्यात आले. शनिवारी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाने नक्षल्यांचा कट उधळला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ६.३०च्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ४० ते ५० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. दोन ते अडीच तास चाललेल्या चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळावरून नक्षल्यांकडील एके-४७ रायफल, एक १२ बोअर रायफल आणि एक ३०३ आणि एक ८ एमएम रायफल, एक लॅपटॉप तसेच दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले. मृत नक्षलवाद्यांचा अनेक गुन्ह्यांत सहभाग nराजू उर्फ सुखदेव बुधेसिंग नैताम (३२) हा टिपागडचा उपकमांडर होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल असून, दहा लाखांचे बक्षीस होते. अमर मुया कुंजाम (३०, रा. जागरगुडा, जिल्हा बस्तर-छत्तीसगड) हा या चकमकीत ठार झालेला एकमेव छत्तीसगडी नक्षली आहे. त्याच्यावर ११ गुन्हे असून दोन लाखांचे बक्षीस होते.  nदोन महिला नक्षल्यांमध्ये सुजाता उर्फ कमला उर्फ पुनीता गावडे उर्फ आत्राम (वय ३८) ही टिपागड एलओएस प्लाटून क्र. १५ ची सदस्य होती. तिच्यावर ३१ गुन्हे असून चार लाखांचे बक्षीस होते. अस्मिता उर्फ सुखलू पदा (२८) हिच्यावर ११ गुन्हे दाखल असून, तिच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारी