उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेजाऱ्याने आत्महत्या केली; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावं लिहिली

By प्रविण मरगळे | Published: November 20, 2020 10:27 AM2020-11-20T10:27:20+5:302020-11-20T11:22:43+5:30

NCP Ajit Pawar News: बहुतांश आरोपी राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. आरोपींमध्ये बारामतीचे नगरसेवक, बारामती सहकारी बँकेचे संचालकांचा समावेश आहे.

Deputy CM Ajit Pawar neighbor commits suicide; names of NCP leaders were written in suicide note | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेजाऱ्याने आत्महत्या केली; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावं लिहिली

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेजाऱ्याने आत्महत्या केली; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावं लिहिली

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी नगरसेवकासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल सुसाईड नोटमध्ये अवैध सावकारीवरुन काहीजण पैशांसाठी छळ करत असल्याचं म्हटलंपोलिसांनी ९ पैकी ६ जणांना अटक केली पण अद्याप ३ आरोपी फरार

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील शेजाऱ्याने आत्महत्या केली आहे. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं असल्याने खळबळ माजली आहे. मृत व्यक्तीच्या मुलाने या संदर्भात बारामती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांना अटक केली आहे तर अद्याप ३ जण फरार आहे.

याबाबत बारामतीतील पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले की, व्यापारी प्रीतम शहा यांनी आत्महत्या केली, परंतु त्यांनी सुसाईड नोटमध्ये अवैध सावकारीवरुन काहीजण पैशांसाठी छळ करत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं व्यापाराने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. व्यापारी प्रीतम शहा यांच्या मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे.

प्रीतम शहा यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, नगरसेवक जयसिंह अशोक देशमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रविण गालिंदे, हनुमंत गवळी, सनी उर्फ सुनील आवळे, संघर्ष गव्हाले, मंगेश आमसे यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. यातील एकजण बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहेत, बहुतांश आरोपी राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. आरोपींमध्ये बारामतीचे नगरसेवक, बारामती सहकारी बँकेचे संचालकांचा समावेश आहे.

बारामती पोलिसांनी सावकारीच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी नगरसेवकासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या ९ पैकी ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेने बारामती शहरात खळबळ माजली आहे. आरोपींनी प्रीतम शहा यांना ३० टक्के व्याजदराने पैसे दिले होते. प्रीतम शहा यांनी घेतलेले पैसे परतही केले परंतु जादा रक्कम वसुलीकरण्यासाठी आरोपींना प्रीतम शहा यांच्या मागे तगादा लावला होता. त्यामुळे कंटाळून प्रीतम शहा यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.   

दरम्यान, या प्रकरणावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जो निकष लावून अर्णब गोस्वामी यांना अटक केली, तोच निकष लावून आता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करा, झेपेल काय? असा सवाल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

Read in English

Web Title: Deputy CM Ajit Pawar neighbor commits suicide; names of NCP leaders were written in suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.