वडगाववडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक यांना मंगळवारी साडेसात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.जितेंद्र दयाराम बडगुजर (वय ५२) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे . वडगाव येथील दस्तनोंदणीचे काम करणाऱ्या एका वकिलाकडून त्यांच्या आशिलांच्या नोंदणी झालेल्या दस्तावर शिक्केमारून सही करण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये अश्या १५ दस्तांचे ७५०० रुपयांची मागणी केली होती.
नोंदणी झालेल्या दस्तांवर शिक्के व सही देण्यासाठी दुय्यम निबंधक पैश्यांची मागणी करत असल्याची तक्रार एका वकिलाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात केल्याने लाज लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील,पोलीस हवालदार नवनाथ वाळके,अंकुश आंबेकर,अभिजीत राऊत यांच्या पथकाने सापळा लाऊन दुय्यम निबंधक बडगुजर यांना मागणी केलेले पैसे शासकीय कार्यालयात स्वीकारताना अटक केली आहे. शासकीय कार्यालयातील फोन स्विचऑफ दुय्यम निबंधक कार्यालयात ही घटना घटल्यानंतर वडगाव येथील विविध शासकीय कार्यालयातील अधिका-यांनी आपले मोबाईल स्विचऑफ ठेवले होते.