रोहतक : हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला पॅरोल देण्यात आला आहे. रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या गुरमीत राम रहीमला तुरुंग प्रशासनाने पॅरोल मंजूर केला आहे. शुक्रवारी सकाळी राम रहीमला तुरुंगातून बाहेर आणण्यात आले असून कडेकोट बंदोबस्तात राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढण्यात आले आहे. पॅरोलच्या कालावधीत तो उत्तर प्रदेशतील बागपत आश्रमात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बागपतच्या बर्नावा गावात हा आश्रम असून राम रहीमचा कॅम्प असेल. हरियाणा सरकारने राम रहीमला एका महिन्यासाठी पॅरोल मंजूर केला आहे.याआधी हरियाणा सरकारने फेब्रुवारीमध्ये राम रहीमला २१ दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यादरम्यान सरकारने राम रहीमच्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्याला Z+ सुरक्षा प्रदान केली होती. सुट्टीच्या काळात राम रहीम बहुतेक वेळ त्याच्या गुरुग्राम आश्रमात राहिला.राम रहीमला 25 ऑगस्ट 2017 रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने दोन साध्वींच्या लैंगिक छळ प्रकरणी शिक्षा सुनावली होती. पंचकुलातील हिंसाचारानंतर राम रहीमची रवानगी सुनारिया तुरुंगात करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. यानंतर पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणातही त्याला शिक्षा झाली होती.राम रहीम अनेकदा तुरुंगातून बाहेर आलाआतापर्यंत राम रहीम अनेकवेळा तुरुंगातून बाहेर आला आहे. गेल्या वर्षी 12 मे 2021 रोजी डेरा प्रमुखाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान राम रहीमला ४८ तासांचा पॅरोल मिळाला होता. तो गुरुग्राममध्ये आपल्या आजारी आईला भेटायला गेला होता. यानंतर, 3 जून 2021 रोजी, PGIMS पुन्हा तपासणीसाठी आणण्यात आले. तसेच ६ जून रोजी त्यांना उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता मेडिसिटीमध्ये दाखल करण्यात आले होते.
डेरा प्रमुख राम रहीमला पॅरोल, 1 महिन्यासाठी जेलबाहेर; 'येथे' असणार ठिकाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 6:05 PM