उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बिजनौरमध्ये एका दिराने त्याच्या वहिनीची हत्या केली. आरोप आहे की, वहिनीने दिराच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला होता. यानंतर दिराने वहिनीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि पुरावे मिटवण्यासाठी तिच्या मृतदेहावर पाणी टाकलं. त्यानंतर शरीरावर माती टाकली.
त्याने पुरावे नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला तरीही पोलिसांनी त्याला पकडलं. पोलिसांना मृतदेहाजवळ दिराचा मोबाइल सापडला. ज्यात त्याच्या वहिनीचा फोटो होता. सध्या दिरासह चार आरोपींना पोलिसांना अटक केली. पोलिसांनुसार, 19 जुलै रोजी एका महिला पहाटे आठ वाजता तिच्या शेतात गेली होती. पण ती बराच वेळ परत आली नाही. तेव्हा तिची सासू तिला शोधण्यासाठी गेली. गावातील लोकांच्या मदतीने तिचा शोध घेत असताना तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत शेतात आढळून आला.
महिलेच्या गळ्यात तिची ओढणी बांधलेली होती. जी बघून वाटत होतं की, तिच्यासोबत आधी रेप करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. कुटुंबियांच्या तक्रारीवर पोलिसांनी 6 लोकांवर गुन्हा दाखल केली. चौकशीतून तीन लोक निर्दोष सापडले. तर तिचा दीर या हत्येचा मुख्य आरोपी निघाला.
चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की, मृत महिला त्याची चुलत वहिनी होती. त्याचा चुलत भाऊ आणि महिलेचा मोठा दीर हरिद्वारमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे ती घरात एकटीच राहत होती. दीड वर्षाआधी त्याचे वहिनीसोबत अनैतिक संबंध झाले होते आणि त्याने अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले होते. गेल्या काही दिवसांपासून तिने दिरापासून अंतर ठेवलं होतं.
घटनेच्या एक दिवसाआधी दिराने त्याच्या मित्रांना हे सांगितलं की, त्याच्या वहिनीने त्याच्यासोबत संबंध तोडले. तेव्हाच मित्रांनी आरोपीला यासाठी तयार केलं की, त्याने त्याच्या वहिनीसोबत त्यांना संबंध बनवण्याची संधी द्यावी. ज्यावर आरोपी तयार झाला. 19 जुलैला सकाळी महिला शेतात गेली तेव्हा हे चार लोक तिथेच पोहोचले.
आरोपीने वहिनीवर त्याच्या तीन मित्रांसोबत संबंध ठेवण्याचा दबाव टाकला. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केली. आरोपींना वाटलं की, ही गावात गेली तर आपली बदनामी होईल. त्यामुळे त्यांनी तिचा गळा आवळून तिची हत्या केली.
त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या शरीरावर काही जखमा झाल्या. ते मिटवण्यासाठी आरोपींनी तिच्या शरीरावर पाणी टाकलं आणि नंतर माती टाकली. यादरम्यान आरोपीचा मोबाइल बाजूलाच पडला. त्यानंतर ते सगळे फरार झाले. पोलिसांना आरोपीचा मोबाइल सापडला. त्यानंतर चौकशी दरम्यान मुख्य आरोपी दिराने सगळा खुलासा केला.