शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अखेर देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट; नवाब मलिकांच्या कुटुंबियांनी कुर्ल्यात ३ एकर संपत्ती अंडरवर्ल्डच्या गुंडाकडून केली खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 1:13 PM

Nawab Malik's Family Bought Property From Underworld Goon : १९९३ बॉम्ब स्फोटातील जन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील ३ एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. मंगळवारी दुपारी 12 वाजता म्हणजेच ९ नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता ते पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडणार. या पत्रकार परिषदेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्ब फोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचा नकाब उघड केला आहे. १९९३ बॉम्ब स्फोटातीलजन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील ३ एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल अशी अंडरवर्ल्डच्या या गुंडांची नावे आहेत.  

 

२००३ साली हा सौदा सुरु झाला होता, नंतर २००५ साली हा सौदा पूर्ण झाला. २.८० एकर म्हणजेच १ लाख २३ हजार स्क्वेअर मीटर जमीन सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीने दाऊदच्या गुंडांकडून खरेदी केली. खरेदीच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांवर फराज मलिक या व्यक्तीची सही आहे. ही जमीन मूळ गोवावाला यांच्या मालकीची होती. सलीम पटेल कोण आहे माहित नव्हतं का?, मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन खरेदी का केली?, २० लाखांत तीन एकर जमीन तुम्हाला कशी काय दिली?, या आरोपींवर टाडा होता, तर टाडाच्या आरोपीची सगळी प्रॉपर्टी सरकार जप्त करतं. मग टाडाच्या आरोपीची संपत्ती जप्त होऊ नये म्हणून तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का? असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.  

 

कोण आहे सरदार शाहवली खान?

सरदार शहावली खान हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार असून याला जन्मठेप लागली आहे आणि ती सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. सध्या तो कारागृहागृत आहे.टायगर मेमनच्या नेतृत्त्वात फायरआर्म ट्रेनिंगमध्ये तो सहभागी झाला होता.बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब कुठे ठेवायचा, याची रेकी त्याने केली. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचे कारस्थान शिजले. त्या सर्व मिटिंगला हा उपस्थित होता. त्याला काय होणार आहे, याची संपूर्ण माहिती होती.अल हुसैनी बिल्डींग माहीममध्ये टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स याने भरले.माफीचे साक्षीदार आणि इतर गुन्हेगारांनी याबाबत प्रत्यक्षदर्शी पुरावा दिला, त्यामुळे त्याला जन्मठेप झाली.

कोण आहे मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल?

सलीम पटेल हा हसीना पारकरचा सहकारी आणि फ्रंटमॅन. तिच्यासोबत याला २००७ मध्ये पकडले होते. त्याला समोर करून संपत्ती बळकाविण्याचे काम ती करायची.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिकBombsस्फोटकेBlastस्फोटLife Imprisonmentजन्मठेपKurlaकुर्लाunderworldगुन्हेगारी जगत