शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल
2
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
3
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
4
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
5
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
6
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
7
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
8
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
9
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
10
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
11
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
12
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
13
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
14
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
15
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
16
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
17
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
18
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
19
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
20
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद

स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा

By सूर्यकांत वाघमारे | Published: December 13, 2022 9:56 AM

फसवी माहिती : नवी मुंबई, मुंबईतील भक्तांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भक्तनिवासामध्ये बुकिंगच्या नावे गंडा घातला जात आहे. मागील एका महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून त्यामध्ये नवी मुंबईसह, मुंबई, पुणे येथील भक्तांची फसवणूक झाली आहे. इंटरनेटवर भक्तनिवासाची माहिती शोधून ऑनलाइन बुकिंग करणारे भक्त या सायबर गुन्हेगारांकडून नाडले जात आहेत.

घणसोली येथे राहणाऱ्या किरण पाटील यांच्यासोबत हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण राज्यात अशी ठकबाजी  सुरू असल्याचे निर्दशनास आले आहे. ते रविवारी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणार होते. यासाठी शनिवारी रात्री ते भक्तनिवासामध्ये राहण्याची सोय आहे का हे तपासात होते. यावेळी ऑनलाइन मिळालेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून त्यांनी फोनवरील व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे ११०० रुपये भरले होते. मात्र, रविवारी ते  भक्तनिवासात पोहचले असता, त्यांच्या नावे बुकिंग नसल्याचे सांगितले. बुकिंग केलेल्या नंबरची माहिती दिली असता, तो नंबर व्यवस्थापनाचा नव्हता.

रोज २५ जण जाळ्यातअशाच प्रकारे दिवसाला २० ते २५ जणांच्या फसवणुकीच्या तक्रारी येत असल्याचेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले. अखेर किरण पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना ऐनवेळी पर्यायी व्यवस्था शोधण्याचा मनस्ताप व भुर्दंड सहन करावा लागला. 

व्यवस्थापनाची पोलिसांत तक्रारयासंदर्भात व्यवस्थापनाने अक्कलकोट पोलिसांकडे व सायबर पोलिसांकडेदेखील तक्रार केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत गुन्हेगार मोकाट असल्याने व इंटरनेटवर भक्तनिवासाच्या नावे फसवी माहिती पसरवली जात असल्याने भक्तांची फसवणूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

बनावट संकेतस्थळाद्वारे फसवणूक

गुन्हेगारांकडून भक्तांची उघड फसवणूक होत असतानाही व्यवस्थापन केवळ पोलिसांकडे तक्रार करून हात वर करत असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मुंबईसह नवी मुंबई, पुणे येथून मोठ्या संख्येने भक्त जात असतात. त्यापैकी अनेकजण भक्त निवासामध्ये राहण्यासाठी ऑनलाइन बुकिंगला प्राधान्य देतात. लांबून येणाऱ्या भक्तांसाठी अल्पदरात निवासाची व्यवस्था म्हणून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्यामार्फत भक्तनिवास चालवले जात आहे. मात्र, त्यांचे कोणतेही अधिकृत संकेतस्थळ नाही. मात्र सायबर गुन्हेगारांनी बनावट संकेतस्थळ तयार केले असून त्यावर वेगवेगळे मोबाइल नंबर दिले आहेत. त्यावर संपर्क केल्यास भक्त निवासामध्ये बुकिंगसाठी आगाऊ पैसे भरण्यास सांगून प्रत्येकाकडून ८०० ते १२०० रुपये घेतले जातात.

टॅग्स :fraudधोकेबाजी