शहरं
Join us  
Trending Stories
1
अहो आश्चर्यम! डोंबिवलीत जेव्हा ठाकरे गट अन् शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येतात...
2
"ते क्रमवारीत पुढे असले तरी..."; बांगलादेशी कॅप्टनचे भारताला चॅलेंज, पाकिस्तानची काढली लाज
3
शिंदेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने कापला 'भावी आमदार' लिहिलेला केक, चर्चांना उधाण
4
यवतमाळमध्ये भिंतीवर डोकं आपटून २१ वर्षीय तरुणाचा खून; दोघांना घेतले ताब्यात
5
Mohammad Shami: मोहम्मद शमीचा 'बंगाल क्रिकेट'कडून अपमान? १० महिन्यांनी बोलवून सत्कार, त्यातही केल्या दोन मोठ्या चुका
6
पुन्हा तेच! कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात महिलेवर अत्याचार, वॉर्ड बॉय अटकेत...
7
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Video: शायनिंग मारायला गेला अन् तोंडावर पडला... पाकिस्तानी खेळाडूची भरमैदानात फजिती
9
वैभव चव्हाण बिग बॉस मराठीमधून बाहेर, अरबाजला अश्रू अनावर! ५० दिवसांचा प्रवास संपला
10
'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल
11
बांगलादेशी विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; प्रवासी रुग्णालयात भरती, प्रकृती स्थिर
12
₹184 चा शेअर ₹6 वर आला, गुंतवणूकदारांना केलं कंगाल; आता देतोय बंपर परतावा, महिनाभरात 80% नं वधारला!
13
मोठी किंमत मोजावी लागेल..!! इस्रायलवर मिसाईल हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहूंचा इशारा
14
“११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत
15
'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य
16
राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं!
17
"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला
18
“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”
19
“२२ वर्षे आमदार, ८४ हजार पेन्शन, मोदी घरी बसले असते तर...”: ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
20
जय श्रीराम! १८० दिवसांत ११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; ३३ कोटी पर्यटकांची युपीला भेट

काशी विश्वनाथ मंदिराची बनावट वेबसाइट तयार करून भाविकांची फसवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 9:54 PM

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काशी ट्रस्टच्या सीईओंनी डीजीपीकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आहे.

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराची बनावट वेबसाइट तयार करून भाविकांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी दर्शन, आरती आणि रुद्राभिषेकाच्या नावाखाली भाविकांची १० लाख रुपयांपर्यंत फसवणूक केली आहे. ज्यावेळी भाविकांनी मंदिराशी संपर्क साधला, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. 

दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काशी ट्रस्टच्या सीईओंनी डीजीपीकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावणात देश-विदेशातील भाविक काशी विश्वनाथ येथे दर्शनासाठी येत असतात. यादरम्यान, काशी विश्वनाथ मंदिराच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करून सायबर गुन्हेगारांनी बुकिंग सुरू केले. यामध्ये रुद्राभिषेकसह दर्शन, पूजा, आरती बुक करण्यात आली होती.

सध्या मंदिराच्या मूळ संकेतस्थळावर श्रावणामुळे सर्व प्रकारची बुकिंग बंद आहे. फसवणूक करणाऱ्यांनी भाविकांना कळू नये, अशा पद्धतीने बनावट वेबसाइट तयार केली. वेबसाइटला भेट देणाऱ्यांना थेट संपर्काचा पर्याय देण्यात आला आहे. बनावट वेबसाईटवर भाविकांनी लॉग इन केल्यानंतर त्यांचा नंबर घेऊन आरोपींनी पैसे थेट आपल्या खात्यात जमा केले. तसेच, लिंकद्वारे नवीन ॲप सुद्धा अपलोड करत असल्याचे समोर आले.

याशिवाय फेक वेबसाइटवर क्लिक करताच होम पेज ओपन होईल. होम पेजवरील पूजा बुकिंगवर क्लिक करताच स्थानिक पंडित यांच्याशी संपर्क साधा असे लिहिले आहे. तसेच, ०९१-०९३३५४७१०१९/०९१९८३०२४७४ हे २ मोबाईल नंबरही देण्यात आले आहेत. फसवणूक करणारे पंडित यांच्या नंबरवरून ऑनलाइन पैसे मागवत होते.

मंदिराच्या सीईओकडून डीजीपींकडे तक्रारमंदिराचे सीईओ विश्वभूषण मिश्रा यांनी डीजीपी प्रशांत कुमार आणि पोलिस आयुक्त मोहित अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये मंदिराची बनावट वेबसाईट डिलीट करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, वेबसाइटवर काशीमध्ये येताना दर्शनाव्यतिरिक्त हॉटेल, बोटी, टूर, ट्रॅव्हल, फ्लाइट आणि लोकल टॅक्सी यांचे बुकिंगही केले जात आहे. पहिल्याच क्लिकवर नंबर घेऊन एजंट ऑफलाइनही संपूर्ण माहिती देत ​​आहेत.

यापूर्वी मंदिराचे फेसबुक पेज सुद्धा हॅक करण्यात आले होतेदरम्यान, तीन महिन्यांपूर्वी मंदिराचे फेसबुक पेज हॅकर्सनी हॅक केले होते. हॅकर्सनी पेजचा पासवर्ड बदलून स्टोरीमध्ये अश्लील पोस्ट्सही अपलोड केल्या होत्या. मात्र, आयटी टीमने पोस्ट हटवली आणि १ तासाच्या आत मंदिराचे फेसबुक पेज रिकव्हर केले होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसीCrime Newsगुन्हेगारी