शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

'जय माता दी' हाच ठरला अखेरचा मेसेज; डिजीपींच्या हत्येनं पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 3:28 PM

डीजीपी लोहिया त्यांचे मित्र संजीव खजूरिया यांच्या घरी सपत्नीक गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी घरातील नोकर यासिरला मसाज करण्यास सांगितले

जम्मू काश्मीरचे डीजीपी हेमंत कुमार लोहिया यांची सोमवारी गळा कापून हत्या करण्यात आली. आरोपीने काचेच्या बॉटलनं पोलीस अधिकाऱ्याचा खून केला. त्याचसोबत पोट आणि हातावर अनेक वार केले. या हत्येची जबाबदारी दहशतवादी संघटना टीआरएफनं घेतली आहे. या घटनेसाठी डीजीपी लोहिया यांच्या सहकाऱ्यावर संशय आहे जो सीसीटीव्ही फुटेजमध्ये पळताना दिसतो. डीजीपीचा फरार नोकर यासिर असं त्याचे नाव आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, डीजीपी लोहिया त्यांचे मित्र संजीव खजूरिया यांच्या घरी सपत्नीक गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी घरातील नोकर यासिरला मसाज करण्यास सांगितले. ते दोघे रुममध्ये गेले. काही वेळाने डीजीपा आवाज आल्यानंतर मित्र आणि कुटुंबीय धावत खोलीजवळ पोहचले. याठिकाणी दरवाजा बंद होता तो तोडून आतमध्ये पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात डीजीपी पडले होते. आरोपीने गळा चिरण्यासोबतच धारदार शस्त्राने शरीरावर अनेक वार केले होते. 

हत्येनंतर आरोपीने कपड्यावर केरोसिन टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु खोलीचा दरवाजा उघडताच यासिर मागील दरवाज्याने पळून गेला. या प्रकरणी संजीव खजूरिया यांचा छोटा भाऊ राजू खजूरिया यांना ताब्यात घेण्यात आले. राजू खासगा सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. अत्यंत निर्दयी पद्धतीने लोहिया यांची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 

संध्याकाळी ५ वाजता सर्वांना जय माता दी बोलले अन्...मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास डीजीपी लोहिया यांनी त्यांच्या सर्व जवळच्या मित्र परिवाराला दुर्गा अष्टमी निमित्त जय माता दी असा व्हॉट्सअप मेसेज पाठवला. ३ दिवसांपूर्वीच ते जम्मूत परतले होते. हेमंत लोहिया हे एकमेव अधिकारी होते जे प्रत्येक अधिकाऱ्यांशी व्हॉट्सअप मेसेजद्वारे दररोज संपर्कात राहायचे. घटनेनंतर मित्र संजीव खजूरिया यांनी सर्वात आधी एडीजीपी मुकेश सिंह यांना फोन केला परंतु त्यांनी कट करत कामात व्यस्त असल्याचं कळवलं.