धनबाद
पान मसाला व्यापारी मुकेश पंडित यांची झारखंडमधील धनबादमध्ये २६ मार्च रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. या हत्येचा खुलासा करताना धनबाद पोलिसांनी मुकेशची पत्नी नीलम देवी आणि तिचा प्रियकर उज्ज्वल शर्मा यांना अटक केली आहे. उज्ज्वलच्या सांगण्यावरून मुकेशचा मोबाईल आणि पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
एसएसपी संजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल शर्मा यांचे घर मुकेश पंडित यांच्या घराजवळ होते. उज्ज्वल शर्मा हा मुकेशच्या दुकानात काम करायचा. त्यामुळे उज्ज्वल शर्मा मुकेशच्या घरी येणे-जाणे होऊ लागले. दरम्यान, उज्ज्वलचे मुकेशच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांनी मिळून मुकेशचा काटा काढायचे ठरवले. त्यामुळे मुकेशची पत्नी आणि उज्ज्वल यांनी मिळून कट रचून त्याची हत्या केली.
तरुणीच्या नावाने सुरू केले फेक फेसबुक अकाउंट!हत्येसाठी उज्ज्वल शर्माने तरुणीच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार केले. फेसबुक अकाउंट बनवले आणि मेसेंजरच्या माध्यमातून मुकेशशी मैत्री केली. मैत्री वाढल्यानंतर उज्ज्वलने मुकेशशी मेसेंजरद्वारे बोलणे सुरू केले. २५ मार्चच्या रात्री मेसेंजरवर झालेल्या संभाषणावेळी उज्ज्वलने मुकेशला भेटण्यासाठी दामोदरपूर फुटबॉल मैदानावर बोलावले आणि मुकेशची गोळ्या घालून हत्या केली.