DHFL Scame : वाधवानच्या जामिनाविरोधात ईडीची उच्च न्यायलायत धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 09:13 PM2020-04-15T21:13:39+5:302020-04-15T21:17:27+5:30
ईडीतर्फे वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्या. प्रकाश नाईक यांच्यापुढे अर्ज सादर केला.
मुंबई : डीएचएफएलचा प्रवर्तक कपिल वाधवान याने जामिनावर सुटका करताना न्यायालयाने घातलेल्या अटींचे व लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने त्याचा जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी सक्तवसुली संचालनालयाने(ईडी)उच्च न्यायालयात बुधवारी धाव घेतली. ईडीतर्फे वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्या. प्रकाश नाईक यांच्यापुढे अर्ज सादर केला.
न्यायालयाने हा अर्ज दाखल करून घेत वाधवान याला नोटीस बजावत या अर्जावर २३ एप्रिल रोजा सुनावणी ठेवली. २०१३ मध्ये मृत्यू पावलेल्या गँगस्टर इकबाल मिर्चीच्या संपत्तीचा व्यवहार केल्याप्रकरणी ईडीने वाधवानवर पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवित त्याला जानेवारी महिन्यात अटक केली. तर फेब्रुवारी महिन्यात विशेष न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. गेल्याच आठवड्यात ईडीने वाधवानच्या पाच आलिशान कार जप्त करण्याचे आदेश दिले. या पाच कारमधून कपिल वाधवानसह त्याच्या कुटुंबियांनी लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वर येथील फार्म हाऊसमध्ये गेला होता.