शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
3
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
4
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
5
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
6
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
7
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
8
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
9
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
10
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
11
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
12
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
13
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
14
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
15
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
16
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
17
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
18
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
19
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
20
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

प्रेमात धोका! प्रेयसीने प्रियकराला कोल्ड ड्रिंकमधून विष पाजले, वर फोन करून म्हटले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 9:24 AM

घरच्यांसाठी प्रियकराचा पिच्छा सोडविण्यासाठी चित्राने खतरनाक प्लॅन आखला होता. चित्रा त्याला छाती ठोकून ये आणि आल्यावर छाती बदडून घे, असे सांगत भेटण्यास बोलवत होती.

उत्तर प्रदेशच्या एटामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीने प्रियकराला भेटण्यास बोलावून कोल्ड ड्रिंकमधून विष पाजले. त्याहून कहर म्हणजे जेव्हा प्रियकर मरणाच्या दारात होता तेव्हा तिने त्याला फोन करून विषप्रयोगातून वाचलास तर गळफास लाऊन घे, ओके गुडबाय, असे म्हटल्याचे समोर येत आहे. 

हे प्रेमप्रकरण नारायण नगरच्या चित्रा आणि हाथरसच्या अंकित कुमारचे आहे. दोघांनाही लग्न करायचे होते. परंतू त्यांचे प्रेमप्रकरण चित्राच्या घरच्यांना पटत नव्हते. यामुळे ते दोघांच्या लग्नाला तयार नव्हते. अखेर घरच्यांसाठी प्रियकराचा पिच्छा सोडविण्यासाठी चित्राने खतरनाक प्लॅन आखला होता. 

चित्राचे लग्न बुलंदशहरच्या एका तरुणाशी लावून दिले होते. तरी देखील चित्रा प्रियकर अंकितला भेटत होती. यामुळे चित्राचा भाऊ तिच्यावर नाराज होता. या साऱ्या विरोधातून चित्राने अंकितचा काटा काढण्याचे ठरविले. एके दिवशी तिने त्याला एटा बस स्टँडवर बोलावले. तसेच त्याला कोल्ड ड्रिंक दिले. काही वेळ बोलून चित्रा घरी परतली. मात्र, इकडे थोड्याच वेळात अंकितची तब्येत बिघडू लागली. यामुळे तो बसमध्ये बसून मैनपुरीला निघाला. 

यावेळी त्याने त्याच्या भावाला फोन करून चित्राने कोल्ड ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून दिले आणि तब्येत बिघडत असल्याचे सांगितले. अंकित मैनपुरीला पोहोचताच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिथे त्याचा मृत्यू झाला. 

जेव्हा अंकित हॉस्पिटलमध्ये अखेरचे श्वास घेत होता, तेव्हा चित्राचा त्याला फोन आला. तेव्हा अंकितने फोन उचलताच चित्राने त्याला काही झाले नसेल तर गळफास लावून घे, गुडबाय असे म्हटले. यावर अंकितने अजून काही राहिले असेल तर ते पण पाज असे म्हटले. तेव्हा चित्राने बस, असाच आपला जीव दे असे उत्तर देऊन फोन ठेवला. 

पोलिसांना अंकित आणि चित्राचे १६ मार्चपूर्वीचे ऑडिओ रेकॉर्डिंग सापडले आहेत. त्यात चित्रा त्याला छाती ठोकून ये आणि आल्यावर छाती बदडून घे, आदी संभाषण हाती लागले आहे. याद्वारे चित्राने अंकितला मारण्याचा आधीपासूनच प्लॅन केला होता हे समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट