धायरी: दुचाकी चोरणाऱ्या तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी साबीर इस्लामउद्दील अलम (वय: १९ वर्षे, रा. चव्हाण आळी, नऱ्हे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचोराचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीस प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यासाठी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलिंग करुन संशयित वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान एक सराईत वाहनचोर सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्माजवळ चोरलेली दुचाकी घेऊन येणार असल्याचे तपास पथकातील पोलीस हवालदार आबा उत्तेकर यांना गुप्त बातमीदारांकडून समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी हॉटेल ब्रह्मा चौकामध्ये सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने याधीही पाच दुचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी मोहन भुरुक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार,उजवल मोकाशी, सचिन माळवे, दयानंद तेलंगे - पाटील, अविनाश कोंडे, धनाजी धोत्रे, निलेश कुलथे, किशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून, सिंहगड रस्ता पोलिसांनी ब्रह्मा हॉटेल चौकामध्ये संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान एक संशयित तरुण तिथून दुचाकी वरून जात असताना पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला 'धूम ' स्टाईल पकडुन त्याची चौकशी केली असता त्याने ती दुचाकी नवले पुलाजवळून चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच याआधी त्याने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ दुचाकी व सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ दुचाकी चोरल्या असल्याचेही कबूल केले. पोलिसांनी सर्व दुचाकी ताब्यात घेऊन जप्त केली आहेत.
पळून जाणाऱ्या वाहनचोरास पोलिसांनी 'धूम' स्टाईलने पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 8:04 PM
Crime News : सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी; पाच दुचाकी हस्तगत
ठळक मुद्देयाप्रकरणी साबीर इस्लामउद्दील अलम (वय: १९ वर्षे, रा. चव्हाण आळी, नऱ्हे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचोराचे नाव आहे.