मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरून आढळलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. स्फोटक प्रकरण समोर येताच अवघ्या काही दिवसांत हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. आता या प्रकरणी डायटम बोन रिपोर्ट समोर आला आहे. त्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (diatom bone report reveals reason behind Mansukh Hiren death)ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली ; किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर आरोपमनसुख हिरेन पाणी पडले त्यावेळी काही वेळ ते जिवंत होते. त्यांच्या फुफ्फुसात खाडीचं पाणी गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डायटम बोन अहवालातून समोर आली आहे. त्याआधी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एक अहवाल काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यात मनसुख यांनी स्वत:ला वाचवण्याचा थोडा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या फुफ्फुसात जास्त पाणी आढळून आलेलं नाही, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून पुढे आली होती.मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंमधील संबंधांबाबत हिरेन यांच्या वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, केला असा दावाडायटम बोन रिपोर्ट म्हणजे काय?वाहत्या पाण्यात डायटम नावाचा पदार्थ असतो. एखादी व्यक्ती पाण्यात बुडाल्यास त्याच्या शरीरात डायटम शिरतो. या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची डायटम टेस्ट पॉझिटिव्ह येते. पण मृतदेह पाण्यात फेकला गेल्यास त्याच्या शरीरात डायटमचा शिरकाव होत नाही. त्यामुळे त्याची डायटम टेस्ट निगेटिव्ह येते.एनआयए करणार मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास?सध्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र एटीएसकडून सुरू आहे. तर अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास एनआयएकडून सुरू आहे. मात्र आता हिरेन यांच्या मृत्यूचा तपासदेखील एनआयएकडून केला जाण्याची शक्यता आहे. अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि हिरेन यांचा मृत्यू या दोन्ही प्रकरणांचा तपास एकमेकांशी संबंध असल्यानं त्यांचा तपास करण्याची परवानगी गृह मंत्रालयाकडे एनआयएनं मागितली आहे.
Mansukh Hiren Case: हिरेन यांचा मृत्यू नेमका कशामुळे? डायटम बोन रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 2:25 PM