सातारा : सातारा शहरातील पोवई नाका भाजी मंडई येथे मी पाटील ओळखले का ?, मंडईत जाऊ नका तपासणी सुरू आहे असे म्हणत वृद्धेच्या गळ्यातील मोहनमाळ लंपास करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी वेणू अण्णासाहेब शिंदे (रा. गोडोली, सातारा) या वृद्धेने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोवई नाका भाजी मंडईच्याजवळ रस्त्यावर मी पाटील मला ओळखले का? मंडईत जाऊ नका तपासणी सुरू आहे, असे अज्ञाताने वृद्धेला सांगितले.
त्यानंतर तुमच्या गळ्यातील मोहनमाळ काढून द्या माझ्याकडे. माझ्याकडे पिशवी असून त्यात ठेवतो असेही स्पष्ट केले. त्यानंतर वृद्धेने मोहनमाळ काढून अज्ञाताकडे दिली. त्यावेळी मोहनमाळ पिशवीत ठेवली पण त वृद्धेकडे दिलीच नाही. त्यानंतर संबंधित दुचाकीवरुन पळून गेला. या मोहनमाळची किंमत सुमारे ५० हजार रुपये इतकी आहे.