गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: सुशांतसिंग राजपूत (३४) याची बहीण मीतू सिंग हिच्यासह त्याचे वडील तसेच या प्रकरणातील मुख्य तक्रारदार के के सिंग यांनाही मुलाच्या आजारपणाची पूर्ण कल्पना होती, अशी शंका एका चॅटमुळे व्यक्त होत आहे. रिया चक्रवर्ती हिला त्यांनी २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी तो पाठवला होता, ज्यात त्यांनी 'फ्रेंड बनकर उसकी देखभाल कर रही हो, उसका "इलाज" करवा रही हो' असा उल्लेख केला असून मग नेमक्या कोणत्या उपचाराबाबत ते विचारणा करत आहेत?, असा प्रश्न विचारला जात आहे.
सुशांतच्या आजारपणाबद्दल माहिती नसल्याचे अद्याप त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होते. मात्र त्याची मॅनेजर श्रुती मोदी आणि मीतू यांच्यात झालेले चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'इंडिया टुडे' ने याचे वृत्त दिले होते. त्या वृत्तानुसार २६ नोव्हेंबर,२०१९ रोजी मीतू स्वतः मोदीला सुशांतच्या priscribition बद्दल आणि डॉक्टरबाबत माहिती विचारताना दिसत आहे. त्यामुळे मीतूला सुशांतच्या आजारपणाबाबत माहित होते हे उघड झाले आहे. त्यानंतर याच महिन्यात तीन दिवसानंतर म्हणजे २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी के के सिंग यांनी रियाला केलेला व्हॉट्सअँप मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ज्यात 'जब तुम जान गयी की मे सुशांत का पापा हु तो बात क्यो नही की. आखीर बात क्या है.फ्रेंड बनकर उसका देखभाल और उसका इलाज करबा रही हो तो मेरा भी फर्ज बनता है की सुशांत के बारे मे सारी जानकारी मुझे भी रहे.इसलीये कॉल कर मुझे भी सारी जानकारी दो' अशा आशयाचा हा मेसेज आहे. यात 'उसका इलाज करवा रही हो' असे त्यांनी म्हटल्याने ते सुशांतच्या नेमक्या कोणत्या उपचाराबाबत रियाकडून जाणून घेऊ इच्छित होते आणि फोन करून मला माहिती दे असे सांगत आहेत? याबाबत संशय व्यक्त होत आहेत. मेसेजला रियाने रिप्लाय दिला नसल्याचे देखील त्यांनी प्रसारमाध्यमाना सांगितले होते. याचाच अर्थ मीतूसह सिंग यांनाही त्याच्या आजारपणाबाबत पूर्ण कल्पना होती असे म्हटले जात आहे. मीतूची चौकशी सीबीआय करणार आहेच, मात्र आता सिंग यांच्याकडेही याबाबत विचारणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.