मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपाने पुन्हा एकदा पोलीस ठाणे गाठले आहे. भाजपाने भोपाळ गुन्हे शाखेत लेखी तक्रार केली असून त्यावर दिग्विजय यांनी दिशाभूल करणारे ट्विट केल्याचा आरोप केला आहे. भाजपा आयटी सेलचे राज्य आयटी संयोजक शिवराज सिंह डाबी यांना दिलेल्या ट्विटसंदर्भात दिग्विजय यांच्याविरूद्ध ही तक्रार केली आहे.
राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री असलेले दिग्विजय सिंह यांनी सोमवारी मध्य प्रदेश भाजपाच्या आयटी सेलचे संयोजक शिवराज सिंह डाबी यांच्या संदर्भात एक ट्विट केले. या ट्विटमध्ये दिग्विजय सिंह यांनी विचारले की एफबीआयच्या मोस्ट वांटेड यादीमध्ये कोणाचे नाव आहे तेच शिवराज डाबी आहेत काय? या ट्विटबरोबरच दिग्विजय सिंह यांनी दोन फोटोही पोस्ट केले होते, ज्यामध्ये एका फोटोत शिवराज सिंह डाबी यांचा आहे, तर दुसर्या फोटोमध्ये डाबी यांचे फुले देऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वागत करताना दिसत आहेत. दुसर्या ट्विटमध्ये दिग्विजयने एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय दिग्विजय सिंह यांनी या विषयावर आणखी तीन ट्विट केले आहे. या ट्वीटमुळे भाजपाने गुन्हे शाखेत पोहोचून दिग्विजय सिंग यांच्याविरोधात तक्रार दिली की, दिग्विजय सिंह यांनी शिवराज सिंह दाबी यांची प्रतिमेला डाग लावण्याच्या उद्देशाने ट्विटर अकाऊंटवरून जाणूनबुजून शेअर केली आहे.शिवराज सिंह डाबी म्हणतात की, दिग्विजय सिंह यांनी मला एफबीआयचे इंडियन सायबर फ्युजीटिव म्हटले आहे आणि समाजात माझी बदनामी करण्याच्या हेतूने माझ्यावर निराधार आरोप केले आहेत. दिग्विजय सिंह यांना याची जाणीव आहे की, अमेरिकेच्या कोणत्याही कोर्टामध्ये माझ्याविरोधात कोणताही खटला प्रलंबित नाही, किंवा सध्या कोणतीही तपास यंत्रणा माझ्या विरोधात चौकशी करीत आहे. असे असूनही ते म्हणाले की, दिग्विजय सिंह यांनी माझी व माझ्या कुटुंबाची प्रतिमा खराब करण्यासाठी बिनबुडाचे आरोप केले आहेत. दिग्विजय सिंह यांच्यावतीने ट्विट केल्यापासून माझे मित्र, ओळखी आणि नातेवाईकांकडून अनेकदा फोनवर विचारपूस केली गेली आहे. त्यामुळे माझे आणि माझ्या कुटुंबाचा अपमान झाला आहे. डाबी म्हणाले की, म्हणूनच मी अशी मागणी केली आहे की, दिग्विजय सिंह यांच्याविरूद्ध योग्य ती कारवाई केली जावी, जेणेकरून ते पुन्हा असे निराधार आरोप करु शकणार नाहीत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला
नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न
सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल
थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या
TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह